Chandrayaan 1 : पृथ्वीमुळेच चंद्रावर तयार होतंय पाणी; 'चांद्रयान-1'ने दिलेल्या डेटामधून मोठा खुलासा

Water On Moon : युनिवर्सिटी ऑफ हवाईच्या संशोधकांनी याबाबत शोध लावला आहे.
Chandrayaan-1 Water On Moon
Chandrayaan-1 Water On MooneSakal
Updated on

Chandrayaan-1 Data : भारताने आतापर्यंत तीन चांद्र मोहिमा राबवल्या आहेत. यातील पहिली चांद्रमोहीम चांद्रयान-1 मुळे चंद्रावर पाण्याच्या अस्तित्वाचा शोध लागला होता. आता याबाबत आणखी एक मोठा खुलासा समोर आला आहे.

चंद्रावर पाणी तयार होण्यासाठी पृथ्वीवरुन जाणारे हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स कारणीभूत असू शकतात, असं वैज्ञानिकांनी म्हटलं आहे. चांद्रयान-1 मधून मिळालेल्या रिमोट सेन्सिंग डेटामधून ही गोष्ट समजली आहे. टेलिग्राफने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

Chandrayaan-1 Water On Moon
Chandrayaan-3 : कोरियाच्या ‘धानुरी’ने टिपले विक्रम लँडरचे छायाचित्र

युनिवर्सिटी ऑफ हवाईच्या संशोधकांनी याबाबत शोध लावला आहे. पृथ्वीच्या भोवती असणाऱ्या प्लाझ्मा शीटमुळे चंद्रावरील खडकांची झीज होते आहे, आणि यामधूनच विविध प्रकारची खनिजे बाहेर पडत असल्याचं या संशोधकांनी म्हटलं आहे. नेचर अ‍ॅस्ट्रोनॉमी या विज्ञान विषयक जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झालं आहे

पृथ्वीवरून जाणाऱ्या इलेक्ट्रॉन्समुळेच चंद्रावर पाणी तयार होण्यासाठी मदत मिळाली असावी, असं या रिसर्चमध्ये म्हटलं आहे. याबाबत आणखी अभ्यास केल्यास, चंद्राच्या कायम सावलीत असणाऱ्या भागात आढळलेल्या बर्फाबाबतही अधिक माहिती मिळू शकते, असं संशोधकांनी म्हटलं आहे.

Chandrayaan-1 Water On Moon
Aditya L1 Update : 'आदित्य एल-1'चं सूर्याकडं आणखी एक पाऊल! चौथं ऑर्बिट मॅन्यूव्हर यशस्वी

असा लागला शोध

यापूर्वी चंद्राच्या पृष्ठभागावर होणाऱ्या बदलांसाठी पूर्णपणे सौरवादळं कारणीभूत आहेत असं मानलं जात होतं. मात्र, चंद्र पृथ्वीच्या मॅग्नेटोटेलमधून जात असताना त्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला. (मॅग्नेटोटेल म्हणजे सूर्याच्या विरुद्ध दिशेला असलेली बाजू, जिथे केवळ पृथ्वीच्या प्लाझ्मा शीटचा प्रभाव दिसतो.) तर अशा वेळी देखील चंद्राच्या पृष्ठभागावर परिणाम होत असल्याचं दिसून आलं.

"चंद्र पृथ्वीच्या मागे लपलेला असताना त्यावर सौर हवा आदळण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे अशा वेळी चंद्रावर पाणी तयार होण्याची शक्यताही शून्य होती. मात्र, अशा वेळी देखील त्याठिकाणी पाणी तयार होत असल्याचं रिमोट सेन्सिंग डेटामधून दिसून आलं. हे खरंच आश्चर्यकारक होतं", असं या असिस्टंट रिसर्चर शुआई ली यांनी म्हटलं.

Chandrayaan-1 Water On Moon
Aditya L1 Selfie : 'आदित्य'ने काढला सेल्फी; पृथ्वी अन् चंद्राचेही काढले फोटो! पाहा व्हिडिओ

'चांद्रयान-1'च्या डेटाचा उपयोग

या संशोधनासाठी ली आणि त्यांच्या टीमने चांद्रयान-1 ने 2008 आणि 2009 साली गोळा केलेल्या रिमोट सेन्सिंग डेटाचा वापर केला. चांद्रयानातील मून मायनेरॅलॉजी मॅपर इन्स्ट्रुमेंटने हा डेटा गोळा केला होता.

भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोने ऑक्टोबर 2008 मध्ये चांद्रयान-1 लाँच केलं होतं. हे चांद्रयान 2009 च्या ऑगस्ट महिन्यापर्यंत चंद्राची माहिती पुरवत होतं. यामध्ये एक ऑर्बिटर चंद्राचं निरीक्षण आणि अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. सोबतच एक इम्पॅक्टर देखील लाँच करण्यात आलं होतं.

Chandrayaan-1 Water On Moon
Selling Scrap: रद्दी विकून मोदी सरकार झाले मालामाल! चांद्रयान 3 च्या बजेट इतके कमावले पैसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.