Chandrayaan 3: चंद्रावरील 'सल्फर'ची आणखी एका तंत्रज्ञानानं पुष्टी; चांद्रयानाच्या शोधावर शिक्कामोर्तब

यामुळं आता भारतासह जगासाठी ही महत्वाची गोष्ट ठरली आहे.
Chandrayaan 3: चंद्रावरील 'सल्फर'ची आणखी एका तंत्रज्ञानानं पुष्टी; चांद्रयानाच्या शोधावर शिक्कामोर्तब
Updated on

बंगळुरु : आणखी एका तंत्रज्ञानानं चंद्रावर सल्फर असल्याची पुष्टी करण्यात आली आहे, त्यामुळं चांद्रयानाच्या शोधावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळं भारतासह जगासाठी ही महत्वाची गोष्ट ठरली आहे.

दोन दिवसांपूर्वीच प्रज्ञान रोव्हरनं चंद्रावर सल्फर, ऑक्सिजनसह इतर मुलद्रव्ये असल्याचं सांगितलं होतं. पण आता नव्या तंत्रानुसार ते निश्चित झालं आहे. इस्त्रोनं याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. (Chandrayaan 3 another technology APXS confirms presence of sulphur on moon)

Chandrayaan 3: चंद्रावरील 'सल्फर'ची आणखी एका तंत्रज्ञानानं पुष्टी; चांद्रयानाच्या शोधावर शिक्कामोर्तब
Sudhir Mungantiwar : ''...आता रडायचं नाही चौकशीला सामोरं जायचं'' सुधीर मुनगंटीवारांनी भरला दम

इस्त्रोच्या ट्विटनुसार, इन-सीटू वैज्ञानिक प्रयोगाद्वारे रोव्हरवरील आणखी एक साधनाद्वारे, तंत्राद्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जिथं विक्रम लँडर उतरला आहे त्या प्रदेशात सल्फरच्या (S) उपस्थितीची पुष्टी झाली आहे. अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोपने (APXS) सल्फरसह इतर किरकोळ घटक शोधले आहेत.

नवं गृहितक मांडावं लागणार

इस्त्रोनं पुढे म्हटलंय की, चांद्रयान ३ चा हा शोध शास्त्रज्ञांना या भागातील सल्फरच्या (S) स्रोतासाठी नवीन गृहितक मांडण्यास भाग पाडतो. त्यानुसार, हे सल्फर चंद्राच्या जमिनीतील आंतरिक भागात अस्तित्वात आहे का?, की ज्वालामुखीच्या उद्रेकातून? की उल्कापातामुळं आढळून आलं आहे, हे तपासावं लागणार आहे.

Chandrayaan 3: चंद्रावरील 'सल्फर'ची आणखी एका तंत्रज्ञानानं पुष्टी; चांद्रयानाच्या शोधावर शिक्कामोर्तब
Jawan Trailer : 'सो कली, नो डील' शाहरुखच्या 'जवान'नं अल्लू अर्जुनलाही फोडला घाम!

अहमदाबादमधील संस्थेच्या सहकार्यानं

रोव्हरवर असलेल्या अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोप (APXS) हे तंत्रज्ञान अहमदाबाद येथील PRL या संस्थेच्या सहकार्यानं बंगळुरुतील URSC या संस्थेनं ही यंत्रणा विकसित केली आहे, असंही इस्त्रोनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Chandrayaan 3: चंद्रावरील 'सल्फर'ची आणखी एका तंत्रज्ञानानं पुष्टी; चांद्रयानाच्या शोधावर शिक्कामोर्तब
Sudhir Mungantiwar : ''...आता रडायचं नाही चौकशीला सामोरं जायचं'' सुधीर मुनगंटीवारांनी भरला दम

LIBSनं यापूर्वी पहिल्यांदा 8 मुलद्रव्ये कन्फर्म केली होती

यापूर्वी रोव्हरवरील लेझर-प्रेरित ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप (LIBS) साधनानं पहिल्यांदा इन-सीटू मोजमापाद्वारे, दक्षिण ध्रुवाजवळील चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर असल्याची पुष्टी केली होती. तसेच Al, Ca, Fe, Cr, Ti, Mn, Si, आणि O ही मुलद्रव्ये असल्याचंही सांगितलं होतं. तसेच इथं हायड्रोजनचा (H) शोध सुरू आहे. LIBS इन्स्ट्रुमेंट इलेक्ट्रो-ऑप्टिक्स सिस्टम्स (LEOS)/ISRO, बेंगळुरूच्या प्रयोगशाळेत विकसित करण्यात आलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()