१४ जुलैला जल्लोष करून आपण मोकळे झालो पण इस्रोच्या शास्त्रज्ञांची लढाई संपलेली नाही. आता पुढील ४० दिवस इस्रोचे वैज्ञानिक सतत कार्यरत राहतील. या दरम्यान या यानावर सातत्याने लक्ष ठेवावे लागणार आहे. सध्या हे चांद्रयान अगदी सुरळीतपणे काम करत असल्याची माहिती इस्रोने दिली आहे.
या चाळीस दिवसांत काय काय होणार, असा प्रश्न पडला असेल.
तर उड्डाणानंतर हे यान पृथ्वीभोवती काही वेळा फिरेल.
त्यानंतर ते पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल, लँडर यानापासून वेगळे होईल, डीबूस्ट करण्यासाठी यान चंद्राला फेऱ्या घालेल यातल्या शेवटच्या टप्प्यां करणे,
लँडर यानापासून वेगळं करणे, डीबूस्ट करण्यासाठी चंद्राच्या फेऱ्या मारणे, सॉफ्ट लँडिंग करणे असे बरेच टप्पे आहेत.
फक्त भारतच नव्हे तर अमेरिका, रशिया, चीन, जपान असे दांडगे देशसुद्धा आपल्या या मोहीमेकडे लक्ष लावून बसलेत.
एवढी महत्त्वाची ही मोहीम का आहे? असा प्रश्न पडला असेल.
अवकाश संशोधनात चंद्र फार महत्त्वाचा आहे. खरंतर चंद्रापेक्षा तिथलं वातावरण म्हणजे नसलेलं वातावरण.
तुम्हाला माहितेय का, चंद्रावर पहिलं पाऊल टाकणाऱ्या नील आर्मस्ट्राँगच्या बुटाचे ठसे म्हणे अजूनही आहेत, अवकाशातून ते दिसतात सुद्धा.
आता इतक्या वर्षांपूर्वीचा ठसा कसा राहील, असा प्रश्न पडला असेल ना? तर त्याचं उत्तर आहे, चंद्राच्या जडणघडणीत.
चंद्रावर वातावरणच नाही. त्यामुळे तिथे वादळं येत नाहीत, मातीची धूप, झिज होत नाही.
पण हेच कारण आहे, साऱ्या शास्त्रज्ञांना चंद्राची भुरळ पडल्याचं.
साऱ्या अंतराळअभ्यासकांचा चंद्र लाडका असल्यामागची कारणं आणि चांद्रयान ३ समोरची उद्दिष्ट नेमकी काय आहेत, समजून घेऊया
सूर्यमालेच्या निर्मितीमागची रहस्य
सुमारे ४ अरब वर्षांपूर्वी जेव्हा आपली सूर्यमाला तयार झाली तेव्हा लघुग्रह आणि उल्काश्म सगळ्या ग्रह, उपग्रहांवर आदळत होते.
ज्यामुळे या ग्रह, उपग्रहांवर वादळं निर्माण झाली, घडामोडी घडल्या, जीवजंतुंची निर्मिती झाली. वातावरण घडलं.
मात्र चंद्रावर वातावरणच नाही.
त्यामुळे सूर्यमालेची निर्मिती झाली तेव्हा ज्या काही घडामोडी घडल्या होत्या, त्याचे पुरावे चंद्रावर जसेच्या तसे असतील.
चंद्रावर एखादे यान सुरक्षित उतरले आणि चंद्राचा अभ्यास झाला तर आपल्याला आपल्या सूर्यमालेविषयीची माहिती मिळू शकते.
विश्वाच्या रहस्यातलं एक मह्त्तवाचं पान उलगडू शकतं.
इतर ग्रहांबद्दल ज्ञान मिळेल
आपल्या सूर्यमालेतले काही मोजके ग्रह सोडले तर बाकीच्या ग्रहांविषयी कुणालाच ठोस माहिती नाही.
आपल्या गोष्टींत, स्वप्नांत आणि कल्पनेत असलेले परग्रहवासी खरोखरच आहेत का, हे समजून घेण्याची उत्सुकता पृथ्वीवासियांना गेले कित्येक वर्षं आहे.
मंगळ, बुध इत्यादी ग्रहांच्या वैशिष्ट्यांचा, वयांचा संदर्भ देण्यासाठी शास्त्रज्ञ चंद्राचा वापर करतात.
कारण चंद्रावर पृथ्वी, शुक्रासारख्या ग्रहांप्रमाणे कोणतीही भूसंरचनिक क्रिया झालेली नाही, त्यामुळे
ग्रहांच्या वैशिष्ट्यांच्या वयाचा संदर्भ देण्यासाठी शास्त्रज्ञांद्वारे चंद्राचा वापर केला जातो.
चंद्रावर पृथ्वी आणि शुक्र सारख्या ग्रहांप्रमाणे कोणतीही भूसंरचनिक क्रिया नाही, ज्यामुळे चंद्राची अंतर्गत रचना त्याच्या उत्पत्तीपासून जशी आहे तशीच आहे.
त्यात कोणताही बदल झालेला नाही. याचा अभ्यास करून, ग्रहांची अंतर्गत रचना कशी तयार झाली हे वैज्ञानिक शोधू शकतात.
डीप स्पेस
डीप स्पेस संकल्पनेबद्दल अनेक वाद-प्रवाद आहेत.
आपल्या आध्यात्मामध्येही त्याचा उल्लेख आहे, असं म्हटलं जातं पण खरोखरच डीप स्पेसचं रहस्य काय आहे, ते उलगडण्यासाठी शास्त्रज्ञ चंद्राचा अभ्यास करत आहेत.
कारण चंद्रतो डीप स्पेससाठी पायलट प्रोजेक्ट म्हणून काम करू शकतो.
चंद्राचा अभ्यास करून, शास्त्रज्ञांना चंद्रासारख्या वातावरण नसलेल्या ग्रहांवर लहान कणांचा मारा झाल्याचा आणि वैश्विक किरणोत्सर्गाचा काय परिणाम होतो, हे शोधून काढता येते.
याचा उपयोग शास्त्रज्ञांना पुढच्या अंतराळ मोहीमा आखताना होतो. त्या ग्रहांवर जाण्यासाठी कोणत्या प्रकारचे तंत्रज्ञान वापरावे, याची माहिती मिळते.
हरित उर्जेसाठी महत्त्वाचे
भविष्यात अधिक चांगल्या तंत्रज्ञान विकसीत करून माणूस चंद्रावरील खनिजे स्वतःसाठी वापरू शकतो.
वास्तविक, चंद्रावर भरपूर हेलियम-3 आहे जे पृथ्वीवर फार कमी प्रमाणात आढळते.
जर आपण ते पृथ्वीवर आणू शकलो, तर फ्यूजन प्रक्रियेद्वारे, त्यातून भरपूर ऊर्जा निर्माण होऊ शकते आणि ती हरित ऊर्जेचा एक चांगला स्त्रोत बनू शकते.
याशिवाय जर आपण अधिक चांगले तंत्रज्ञान तयार केले आणि चंद्रावर तळ तयार केला तर तिथलीही उर्जेची गरज भागवू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.