Chandrayaan 3 : हुरर्रे... चंद्राच्या कक्षेत पोहचलो, फोटो पाठवू का? जेव्हा चांद्रयान ३ विचारतो...

चांद्रयान ३ ने पृथ्वीवासियांना सांगितले की, मी चंद्राच्या कक्षेत पोडचलो आहे, त्यांना जळवण्यासाठी फोटो पाठवू का?
Chandrayaan 3
Chandrayaan 3esakal
Updated on

Chandrayaan 3 Is In Moon's Orbit, Sent A Photo :

इस्रोने पाठवलेल्या चांद्रयान-३ ने "मी चंद्राच्या कक्षेत पोहचलो आहे, फोटो पाठवू का?" असा प्रश्न ट्वीट करून विचारला आहे. या ट्वीटला आजवर १६०० वेळा रीट्वीट केले गेले आहे. १० हजारापेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. ८६ वेळा कोट केले गेले. ३७ वेळा बुकमार्क झाले आहे. शिवाय १.६८ लाखाहून जास्त व्हिव्यूज मिळाले आहेत.

ट्वीटमध्ये लिहिले आहे की, Hey earthlings! I'm in the lunar orbit. @isro, could you please allow me to post some pictures? So that I can make them feel jealous!

याचा अर्थ असा की, हे पृथ्वीवासियांनो, मी चंद्राच्या कक्षेत पोहचलो आहे. @isro तुम्ही मला फोटो पोस्ट करण्याची परवानगी द्याल का? जेणे करून मी त्यांना जळवू शकेल.

Chandrayaan 3
ISRO Recruitment : इस्रोमध्ये १०वी अन् आयटीआय उत्तीर्णांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या सविस्तर

चांद्रयान ३ चंद्राचे फोटो पाठवून कोणाला जळवू इच्छित आहे हे जरी स्पष्ट झालेले नसले तरी त्यांनी इशारा मात्र दिला आहे. जगभराचे लक्ष भारताच्या या चांद्रमोहिमेकडे लागले आहे. अमेरिका, रुस, युरोपीय देश, चीन, जपान यांच्या नजरा भारताकडे लागल्या आहेत.

सर्वच हे मिशन यशस्वी होण्याची वाट बघत आहेत. पण असे असू शकते की, काहींना भारताचे आणि इस्रोचे हे यश बघवत नाही, कदाचित त्यांनाच जळवण्याविषयी चांद्रयान ३ सांगत असावे.

Chandrayaan 3
ISRO Satellite Launch : इस्रोची आणखी एक मोठी कामगिरी! सिंगापूरच्या सात उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण

चांद्रयान ३ जेव्हा ५ ऑगस्ट २०२३ ला चंद्राच्या कक्षेत पोहचल्यावर फोटो पाठवले होते. तेंव्हा चांद्रयान ३ चंद्राच्या चहूबाजूंनी १९०० किलोमीटर प्रति सेकंद च्या गतीने १६४ बाय १८०७४ किलोमीटर च्या अंडाकृती कक्षेत फिरत होते. जे नंतर कमी होऊन १७० बाय ४३१३ किलोमीटरच्या कक्षेत आले.

चांद्रयानने किती अंतराचा प्रवास केला, किती बाकी?

१४ जुलै २०२३ - चांद्रयान ३ चे लाँचिंग

३१ जुलै २०२३ - पृथ्वीच्या पाचही कक्षांच्या फेऱ्या करून चंद्राच्या दिशेने कुच केली. याला ट्रांस लूनर इंजेक्शन म्हटले गेले.

५ ऑगस्ट २०२३ - चंद्राच्या पहिल्या कक्षेत प्रवेश

६ ऑगस्ट २०२३ - दुसऱ्या कक्षेत प्रवेश

९ ऑगस्ट - तिसऱ्या कक्षेत प्रवेश

१४ आणि १६ ऑगस्ट २०२३ - चौथ्या आणि पाचव्या कक्षेत प्रवेश

१७ ऑगस्ट २०२३ - चांद्रयान ३ चे प्रॉपल्शन आणि लँडर मॉड्यूल वेगवेगळे होतील.

१८ आणि २० ऑगस्ट २०२३ - लँडर मॉड्यूलचे डीऑर्बिटिंग होईल.

२३ ऑगस्ट २०२३ - लँडर चंद्राच्या दक्षिणी ध्रूवावर लँड करेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.