Chandrayaan-3 : कशा प्रकारे होणार चांद्रयान लाँच? इस्रोने केली रंगीत तालीम; जाणून घ्या दहा टप्पे

१४ जुलै रोजी चांद्रयान अवकाशात झेप घेणार आहे.
Chandrayaan-3 Launch Rehearsal
Chandrayaan-3 Launch RehearsaleSakal
Updated on

इस्रोची महत्त्वाकांक्षी मोहीम असलेल्या चांद्रयान-३ चे लाँच होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहेत. त्यापूर्वी इस्रोने या संपूर्ण लाँचिंगची रंगीत तालीम देखील पूर्ण करून घेतली आहे. आता १४ जुलै रोजी चांद्रयान अवकाशात झेप घेणार आहे.

एखाद्या मोठ्या लाँचपूर्वी त्याचा सराव केला जातो. यामध्ये लाँच सेंटरवरील सर्व केंद्र, टेलिमेट्री सेंटर, कम्युनिकेशन युनिट आणि इतर गोष्टी तपासल्या जातात. हा सराव सुमारे २४ तास चालतो. एखाद्या नाटकाच्या मुख्य शो पूर्वी जशी रंगीत तालीम होते, अगदी तशीच ही प्रक्रिया असते.

Chandrayaan-3 Launch Rehearsal
Chandrayaan-3 Budget : 'चांद्रयान-२' पेक्षा स्वस्त आहे 'चांद्रयान-३' मोहीम; पाहा किती आला खर्च

ही भारताची तिसरी चंद्रमोहीम असणार आहे. चंद्रयान-२ च्या लँडिंगवेळी झालेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे ही मोहीम अयशस्वी ठरली होती. आता पुन्हा एकदा इस्रो चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहे. सध्याची तयारी पाहता, यावेळी नक्कीच चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर लँड होईल, असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

दहा टप्प्यांमध्ये होणार लँडिंग

चांद्रयानची लँडिंग प्रक्रिया ही दहा टप्प्यांमध्ये होणार आहे. यातील पहिला टप्पा पृथ्वीवर पार पडेल. यामध्ये लाँचच्या आधीची स्टेज, उपग्रह आणि रॉकेट अवकाशात उडवणे आणि पृथ्वीच्या विविध कक्षांमधून हे रॉकेट पुढे पाठवणे या तीन गोष्टी असणार आहेत. या सर्व प्रक्रियेत चांद्रयान पृथ्वीच्या भोवती सुमारे सहा चकरा मारेल.

Chandrayaan-3 Launch Rehearsal
विद्यार्थ्यांनी तयार केले चांद्रयान ३ चे पेपर मॉडेल

दुसऱ्या टप्प्यात हे चांद्रयान चंद्राच्या दिशेने ढकलले जाईल. तिसऱ्या टप्प्यामध्ये चांद्रयान चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत पाठवलं जाईल. चौथ्या टप्प्यात हे चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागापासून १०० किमी अंतरापर्यंत नेले जाईल. या टप्प्यापर्यंत चांद्रयान सुमारे सात ते आठ वेळा चंद्राभोवती चक्कर मारेल.

पाचव्या टप्प्यामध्ये प्रोपल्शन मॉड्यूल आणि लूनार मॉड्यूल एकमेकांपासून वेगळे होतील. सहावा टप्पा डी-बूस्ट फेज असणार आहे. यामध्ये चांद्रयानाची गती कमी करण्यात येईल. सातवा टप्पा प्री-लँडिंग फेज असणार आहे. यामध्ये लँडिंगची तयारी सुरू होईल.

Chandrayaan-3 Launch Rehearsal
Chandrayaan-3 Launch : इस्त्रोची चांद्रयान-३ बद्दल मोठी घोषणा! 'या' दिवशी उतरणार चंद्रावर

आठव्या टप्प्यात हे चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर लँड होईल. नवव्या टप्प्यात लँडर आणि रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरून कामाची तयारी सुरू करतील. यानंतर दहाव्या टप्प्यात प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या १०० किलोमीटर कक्षेत पुन्हा परत जाईल.

कधी पोहोचणार?

या सर्व प्रक्रियेला पूर्ण होण्यासाठी सुमारे ४० दिवसांचा कालावधी लागणार असल्याची माहिती इस्रोने दिली आहे. इस्रोने यावेळी चांद्रयानासाठी ऑर्बिटर ऐवजी प्रोपल्शन मॉड्यूल वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

Chandrayaan-3 Launch Rehearsal
Gaganyaan : 'गगन'भरारी घेण्यासाठी लागणार आणखी वेळ; इस्रो खबरदारी घेत उचलणार पावलं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.