Chandrayaan-3 Launch : चांद्रयान-3 आणि चांद्रयान-2 मध्ये कोणता फरक? जाणून घ्या प्रक्षेपणापासून लक्ष्यापर्यंत अनेक गोष्टी

दुसऱ्या चांद्रयान मोहिमेतून धडा घेत, चांद्रयान-३ मध्ये बदल करण्यात आले आहेत.
Chandrayaan-3 Launch
Chandrayaan-3 LauncheSakal
Updated on

भारताची तिसरी चंद्र मोहीम उद्या दुपारी 2.35 वाजता प्रक्षेपित होणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ISRO श्री हरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून याचे प्रक्षेपण करणार असून हे यान 42 दिवसांचा प्रवास करून चंद्रावर पोहोचण्याचं भारताचं स्वप्न साकार होईल.

मोहिमेच्या यशामुळे अवकाश क्षेत्रात नवीन शोध लागतील. आपला देश चंद्रावर यशस्वीपणे उतरलेल्या देशांच्या यादीत सामील होणार आहे. आत्तापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन हे एकमेव देश आहेत ज्यांनी हा पराक्रम केला आहे.

Chandrayaan-3 Launch
Chandrayaan-3 Launch : पृथ्वीच्या बाहेरच्या कक्षेत किती वेळात पोहोचेल चांद्रयान-3? किती असेल रॉकेटचं स्पीड?

भारताला इतिहास रचण्याची संधी

भारताने 2019 मध्ये चांद्रयान-2 लाँच केले. जर ते यशस्वी झाले असते, तर त्याच मोहिमेद्वारे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा जगातील चौथा देश बनला असता. परंतु लँडरमध्ये वेळेत बिघाड झाल्यामुळे ते मिशन होऊ शकले नाही. विशेष म्हणजे 2019 पासून आतापर्यंत इतर कोणताही देश हे करू शकलेला नाही. 2019 मध्ये, एका इस्रायली खाजगी कंपनीने असं करण्याचा प्रयत्न केला, परंतु मिशन अयशस्वी झाले. यानंतर 2021 मध्ये यूएईच्या रोव्हरसह जपानची चंद्र मोहीमही अयशस्वी ठरली होती.

संपूर्ण मिशन 42 दिवस चालेल

प्रक्षेपणानंतर चांद्रयान-3 पृथ्वीच्या कक्षेत 179 किमी प्रवास करेल. पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडल्यानंतर ते चंद्राच्या दिशेने जाईल. गुरुत्वाकर्षणाचे उल्लंघन करून, प्रणोदन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. त्यानंतर ते लँडरपासून वेगळे होईल. या प्रक्रियेला 42 दिवस लागतील. 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 चे लँडर सॉफ्ट लँडिंग करू शकते अशी शक्यता इस्रोकडून वर्तवण्यात येत आहे. (ISRO Chandrayaan Mission)

Chandrayaan-3 Launch
ISRO Moon Mission : चांद्रयान-२ पासून धडा घेत केल्या चांद्रयान-३ मध्ये सुधारणा; 'या' गोष्टींमुळे यशस्वी होणार यंदाची मोहीम

चंद्रावरील दिवस

चंद्रावरील शोधाची जबाबदारी रोव्हरवर असेल. इस्रोच्या म्हणण्यानुसार, चंद्रावर सूर्यप्रकाश असताना सॉफ्ट लँडिंग होईल. लँडर आणि रोव्हर चंद्रावर पूर्ण दिवस घालवतील. जे पृथ्वीवरील 15 दिवसांच्या समतुल्य आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरल्यानंतर रोव्हर लँडरपासून वेगळे होईल आणि माहिती गोळा करेल. चांद्रयान-3 चे लँडिंग साईट चांद्रयान-2 पेक्षा वेगळ्या पद्धतीने करण्यात आले आहे. चांद्रयान-2 मधून घेण्यात आलेल्या चंद्राच्या छायाचित्रांनंतर हा बदल करण्यात आला आहे.

Chandrayaan-3 Launch
Chandrayaan-3 : लुना-2, अपोलो ते चांद्रयान; या आहेत जगातील 10 मोठ्या चंद्र मोहिमा

चांद्रयान-3 मुळे काय साध्य होणार?

चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर, चांद्रयान-3 त्याच्या पृष्ठभागासह, खनिजांसह अनेक माहिती गोळा करेल. चांद्रयान-3 सोबत पाठवलेल्या लँडर आणि रोव्हरमध्ये मागील वेळेप्रमाणे सहा पेलोड स्थापित केले गेले आहेत. सर्वसाधारणपणे, पेलोड डेटा ट्रान्समिशन युनिटसारखे कार्य करते. चांद्रयान-3 च्या लँडरमध्ये चार पेलोड आहेत. जे चंद्रावर येणारे भूकंप, पृष्ठभागाची थर्मल प्रॉपर्टी, प्लाझ्मा आणि चंद्राचे पृथ्वीपासूनचे अचूक अंतर ओळखेल.

त्याचप्रमाणे, रोव्हरमध्ये दोन पेलोड्स आहेत, जे चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचतील आणि मातीतील रासायनिक आणि खनिज रचना शोधतील आणि चंद्राच्या माती आणि खडकांमधील खनिजांची माहिती गोळा करतील. त्याचा तिसरा भाग प्रोपल्शन मॉड्यूल आहे, जो पुढील सहा महिने चंद्राच्या कक्षेत राहील आणि लहान ग्रहाप्रमाणे फिरत राहील.

Chandrayaan-3 Launch
Chandrayaan-3 Budget : 'चांद्रयान-२' पेक्षा स्वस्त आहे 'चांद्रयान-३' मोहीम; पाहा किती आला खर्च

चांद्रयान-2 पेक्षा वेगळं काय?

चांद्रयान-3 हे त्याच्या पूर्वीच्या मिशनपेक्षा खूप वेगळे आहे, खुद्द इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी एका मुलाखतीत हे सांगितले. ते म्हणाले की, आम्ही भूतकाळातील चुकांमधून धडा घेत चांद्रयान-3 मिशन तयार केले आहे. आमचे लक्ष गेल्या वेळी कुठे चुकले आणि ते कसे दुरुस्त करता येईल यावर केंद्रित होते.

असे आहेत फरक

  • चांद्रयान-2 मध्ये ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर हे तीन घटक होते, तर चांद्रयान-3 मध्ये ऑर्बिटरच्या जागी प्रोपल्शन मॉड्यूलचा समावेश करण्यात आला आहे.

  • चांद्रयान-2 चे एकूण वजन 3850 किलो होते, तर चांद्रयान-3 dqy otu 3900 किलो आहे.

  • चांद्रयान-2 मोहिमेची योजना 1 ते 7 वर्षांसाठी होती, तर चांद्रयान-3 मोहिमेचे आयुष्य 3 ते 6 महिन्यांचे आहे.

  • चांद्रयान-2 ला चंद्रावर पोहोचण्यासाठी 48 दिवस लागले, तर चांद्रयान-3 हे 42 दिवसात करू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()