Chandrayaan-3 Landing : चांद्रयान-3 चं 'सॉफ्ट लँडिंग' कुठे होणार? शेवटच्या क्षणीही जागा बदलता येते? जाणून घ्या सर्वकाही

Chandrayaan-3
Chandrayaan-3sakal
Updated on

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) चे बहुप्रतिक्षित मिशन चांद्रयान-3 आज म्हणजेच 23 ऑगस्टच्या संध्याकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. प्रक्षेपणानंतर 22 दिवसांनी चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करेल. यासह भारत इतिहास रचणार असून असे करणारा जगातील चौथा देश ठरणार आहे. एवढेच नाही तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करणारा भारत हा पहिला देश ठरणार आहे.

इस्त्रोकडून या मोहिमेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. शास्त्रज्ञांच्या टीमने यावेळी सॉफ्ट लँडिंग दरम्यान 'लास्ट मिनिट ऑफ टेरर'चा धोका जवळपास संपवला आहे. लँडिगच्या वेळी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित लँडिंगसाठी वापरता येतील असे सर्व उपाय यावेळी तयार ठेवण्यात आले आहेत.

चांद्रयान-3 मिशन काय आहे? चांद्रयान-3 कुठे उतरणार? शेवटच्या क्षणी लँडिंग स्पॉट बदलता येईल का? यावेळी कोणत्या प्रकारचे स्थान निवडले आहे? चला तर समजून घेऊयात...

Chandrayaan-3
Chandrayaan 3 Landing: ऐतिहासिक सोहळा! PM नरेंद्र मोदी हजर असणार की नसणार? इथं वाचा...

चांद्रयान-3 म्हणजे काय?

इस्रोच्या म्हणण्यानुसार, चांद्रयान-3 मिशन चांद्रयान-2 चा पुढचा टप्पा आहे, जो चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल आणि चाचण्या घेईल. यात प्रोपल्शन मॉड्यूल, लँडर आणि रोव्हर असतात. चांद्रयान-3 चा फोकस चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग करण्यावर आहे. अभियानाच्या यशस्वितेसाठी नवीन उपकरणे तयार करण्यात आली आहेत. अल्गोरिदम सुधारले आहेत. चांद्रयान-2 मोहीम ज्या कारणांमुळे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरू शकली नाही त्या कारणांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

14 जुलै रोजी दुपारी 2:35 वाजता हे मिशन श्रीहरिकोटा केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले आणि जर सर्व काही व्यवस्थितपणे झाले तर ते 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरेल. या मोहिमेमुळे अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर सॉफ्ट लँड करणारा भारत हा जगातील चौथा देश बनणार आहे.

भारतीय मिशन कुठे उतरणार?

चांद्रयान-3 मिशन चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणार आहे. लँडिंग साइट ही चंद्रावरील एकदम ध्रुवीय प्रदेशात नाहीये. चांद्रयान-3 साठी निश्चित केलेली साइट सुमारे 68 अंश दक्षिण अक्षांश आहे. परंतु हे अद्याप चंद्रावरील इतर कोणत्याही लँडिंगपेक्षा दक्षिणेकडील बाजूस खूप दूर आहेत. जगातील सर्व मोहिमा विषुववृत्तीय प्रदेशात करण्यात आल्या आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे या भागात जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळतो.

Chandrayaan-3
Chandrayaan 3 Landing : चार टप्प्यांमध्ये होणार 'चांद्रयान-3'चं लँडिंग; शेवटच्या 15 मिनिटांमध्ये काय होईल? जाणून घ्या

सॉफ्ट लँडिंगसाठी कोणते बदल केले गेले आहेत?

चांद्रयान-2 मधून धडा घेऊन चांद्रयान-3 मध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. नियोजित लँडिंग क्षेत्र 4.2 किमी लांबी आणि 2.5 किमी रुंदीपर्यंत वाढविण्यात आले आहे. चांद्रयान-3 मध्ये लेझर डॉप्लर व्हेलोमेट्रीसह चार इंजिन देखील आहेत ज्याचा अर्थ चंद्र लँडिंगच्या सर्व टप्प्यांमध्ये ते त्याची उंची नियंत्रित करू शकते.

चांद्रयान-3 ने कोणत्याही अनपेक्षित प्रभावाचा सामना करण्यासाठी तयार आहे. यात अधिक उपकरणे, अद्ययावत सॉफ्टवेअर आणि एक मोठी इंधन टाकी देखील बसवण्यात आली आहे. शेवटच्या क्षणी कोणतेही बदल करायचे असल्यास ही साधने महत्त्वपूर्ण ठरतील.

इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ म्हणाले की 2019 चा चांद्रयान-2 मोहीम अंशतः यशस्वी झाली होती, परंतु त्यातून मिळालेले अनुभव चंद्रावर लँडर उतरवण्याच्या इस्रोच्या नवीन प्रयत्नात खूप उपयुक्त ठरले. या अंतर्गत चांद्रयान-3 मध्ये अनेक बदल करण्यात आले.

अगदी शेवटच्या क्षणीही लँडिंगचे ठिकाण बदलता येईल का?

चांद्रयान-2 पासून धडा घेऊन इस्रोने चांद्रयान-3 मध्ये व्यापक बदल केले आहेत. चांद्रयान-2 च्या लँडिंगसाठी निश्चित करण्यात आलेले क्षेत्र आता मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आले आहे. लँडिंगसाठी सुमारे 10 चौरस किलोमीटर क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. एक जागा उतरण्यासाठी योग्य नसेल तर दुसरी जागाही तयार असेल.

दरम्यान, आधी विक्रम लँडरसाठी अनुकूल परिस्थिती तपासली जाईल, असे इस्रोने म्हटले आहे. लँडिंगच्या नियोजित वेळेच्या दोन तास आधी चांद्रयान-3 उतरवणे किंवा न उतरवण्याचा अंतिम निर्णय घेतला जाईल. इस्रोचे शास्त्रज्ञ नीलेश एम देसाई यांच्या म्हणण्यानुसार, जर चांद्रयान-3 हे 23 ऑगस्टला उतरले नाही तर ते 27 ऑगस्टलाही चंद्रावर उतरवले जाऊ शकते.

चांद्रयान-३ ला लक्ष्यित ठिकाणाहून पुढे मागे नेण्याची व्यवस्था आहे. एक किलोमीटरच्या परिघात सुरक्षित लँडिंग होऊ शकते. एका ठिकाणी योग्य नसल्यास दुसऱ्या ठिकाणी लँडिंग केले जाईल. चांद्रयान-2 मध्ये पाच इंजिने होती, यावेळी चार इंजिन ठेवण्यात आली आहेत. चांद्रयान-3 चे वजन कमी राहावे यासाठी असे करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()