Chandrayaan-3 MahaQuiz : इस्रोची प्रश्नमंजूषा स्पर्धा, लाखोंची बक्षीसे! आतापर्यंत 12 लाख स्पर्धकांची नोंदणी, असा घ्या सहभाग

MyGov Quiz : 1 सप्टेंबरपासून ही प्रश्नमंजूषा स्पर्धा सुरू झाली आहे.
Chandrayaan-3 MahaQuiz
Chandrayaan-3 MahaQuizeSakal
Updated on

चांद्रयान-3 मोहीम यशस्वीपणे पार पाडून इस्रोने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. यानंतर पंतप्रधान मोदींनी इस्रोच्या वैज्ञानिकांची भेट घेत त्यांचं अभिनंदन केलं. याच वेळी पंतप्रधान मोदींनी 'चांद्रयान-3 महा क्विज'ची घोषणा केली होती. यामध्ये आतापर्यंत तब्बल 12 लाख स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

1 सप्टेंबरपासून ही प्रश्नमंजूषा स्पर्धा सुरू झाली आहे. तुम्हीही यामध्ये सहभाग नोंदवू शकता. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या व्यक्तीला एक लाख रुपये बक्षीस मिळणार आहेत. तर, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या व्यक्तीला अनुक्रमे 75,000 आणि 50,000 रुपये बक्षीस मिळेल.

Chandrayaan-3 MahaQuiz
Chandrayaan 1 : पृथ्वीमुळेच चंद्रावर तयार होतंय पाणी; 'चांद्रयान-1'ने दिलेल्या डेटामधून मोठा खुलासा

या स्पर्धेमध्ये चौथ्या क्रमांकानंतर पुढील 100 स्पर्धकांना 2,000 रुपये बक्षीस मिळेल. तर त्यापुढील 200 स्पर्धकांना 1,000 रुपये बक्षीस मिळणार आहे. यासोबतच, प्रश्नमंजूषा स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना एक सहभाग प्रमाणपत्र मिळणार आहे.

काय आहे स्पर्धा?

इस्रो आणि भारत सरकारने ही प्रश्नमंजूषा स्पर्धा सुरू केली आहे. यामध्ये स्पर्धकांना 300 सेकंदांमध्ये 10 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. हे प्रश्न चांद्रयान-3 मोहीम आणि चंद्राबाबत असतील. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे.

Chandrayaan-3 MahaQuiz
Chandrayaan-3 : कोरियाच्या ‘धानुरी’ने टिपले विक्रम लँडरचे छायाचित्र

असा घ्याल सहभाग

  • या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी सर्वप्रथम isroquiz.mygov.in या वेबसाईटवर जावं लागेल.

  • त्यानंतर Participate Now या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला MyGov अकाउंट तयार करावं लागेल. यासाठी मागितलेली माहिती भरावी लागेल.

  • यासाठी तुम्ही भारतीय नागरिक असणं, आणि तुमच्याकडे भारतीय मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे.

  • या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी एंटर केल्यानंतर तुमचं क्विझ सुरू होईल.

  • सर्व प्रश्नांची उत्तरं देऊन झाल्यानंतर तुम्हाला 24 तासांमध्ये SMS किंवा emailच्या माध्यमातून क्विझ सर्टिफिकेट मिळेल.

Chandrayaan-3 MahaQuiz
Aditya L1 Update : महत्त्वाचा टप्पा पार! पृथ्वीच्या कक्षेबाहेर पडून 'आदित्य' उपग्रह 'एल-1' पॉइंटच्या दिशेने रवाना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.