Chandrayaan 3 : भारताची ऐतिहासिक चांद्रमोहीम; सुरूवातीपासून, शेवटपर्यंत... जाणून घ्या 'चांद्रयान-3'चा प्रवास!

ISRO Moon Mission : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे.
ISRO Moon Mission Chandrayaan 3
ISRO Moon Mission Chandrayaan 3eSakal
Updated on

भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम यशस्वीपणे पार पडली आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 6:04 वाजता 'चांद्रयान-3' हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सुरक्षितपणे लँड झालं. यानंतर चंद्राच्या या भागात सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा पहिलाच देश ठरला.

'चांद्रयान-3'चा प्रवास हा खरंतर 'चांद्रयान-1'च्या यशानंतरच सुरू झाला होता. पहिल्या चांद्रयानाने चंद्रावर पाण्याचे अंश असल्याचा शोध लावला होता. याचाच अधिक अभ्यास करण्यासाठी चंद्राच्या पृष्ठभागावर जाणं आवश्यक होतं, त्यामुळे चांद्रयान-2 मोहीम आखण्यात आली. दुर्दैवाने चांद्रयान-2 हे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करू शकलं नाही; मात्र त्यामुळे इस्रोचे वैज्ञानिक खचले नाहीत.

ISRO Moon Mission Chandrayaan 3
Chandrayaan 3 Landing : चांद्रयान मोहीम यशस्वी होताच महिलांनी केली चंद्राची आरती; राष्ट्रगीत म्हणून भारतमातेचाही केला जयघोष

'चांद्रयान-2' हे चंद्रावर क्रॅश झालं असलं, तरी ते चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचलं होतं. यामुळे इस्रोच्या वैज्ञानिकांना हुरूप आला होता. म्हणून लगेचच तिसऱ्या चांद्रयान मोहिमेची तयारी सुरू करण्यात आली. सॉफ्ट लँडिंग आणि चंद्राच्या जमीनीचा अभ्यास, हेच लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन नव्याने चांद्रयानाची निर्मिती सुरू झाली.

चुकांमधून घेतला धडा

चांद्रयान-2 मोहिमेच्या अपयशातून इस्रोच्या शास्त्रज्ञांनी धडा घेतला. यामुळेच चांद्रयान-3चं मॉडेल हे सक्सेस बेस्ड नाही, तर फेल्युअर बेस्ड होतं. मागील चांद्रयान हे शेवटच्या काही मिनिटांमध्ये क्रॅश झालं होतं, त्यामुळे लँडिंगच्या या फेजसाठी चांद्रयान-3मध्ये विशेष काळजी घेण्यात आली.

ISRO Moon Mission Chandrayaan 3
Chandrayaan 3 Viral Memes : 'सुनो गौर से दुनियावालो, आम्ही आता चंद्रावर आलो!' भारताची चांद्रयान मोहीम जगात भारी

लँडिंगचे चार टप्पे

चांद्रयानाला पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या कक्षेत नेणं ही गोष्ट दुसऱ्या मोहिमेत देखील यशस्वी झाली होती. खरं आव्हान हे शेवटच्या 18 मिनिटांचं होतं. रफ ब्रेकिंग फेज, अल्टिट्यूड होल्डिंग फेज, फाईन ब्रेकिंग फेज आणि टर्मिनल डिसेंट फेज अशा चार टप्प्यांमध्ये लँडर मॉड्यूल चंद्रावर उतरलं.

अखेरची 18 मिनिटे

  • रफ ब्रेकिंग (690 सेकंद)

    सायंकाळी पाच वाजून 44 मिनिटांनी विक्रम लँडर चंद्रावर उतरण्याची प्रक्रिया सुरु झाली. या टप्प्यात चंद्राच्या पृष्ठभागापासून तीस किलोमीटर उंचीवर असलेले लँडर सुरुवातीला समांतर रेषेत पुढे जाण्यास सुरुवात झाली. लँडर हळूहळू लंबरेषेत येऊन ते 7.4 किलोमीटरपर्यंत आले.

  • अल्टिट्यूड होल्ड (10 सेकंद)

    या टप्प्यात यानातील सेन्सर अपडेट झाली. त्यांनी चांद्रभूमीची छायाचित्रे काढून ती पृथ्वीकडे पाठविण्याचे काम सुरु झाले. या टप्प्यात 7.4 किलोमीटरवरून लँडर 6.8 किलोमीटरपर्यंत आला.

ISRO Moon Mission Chandrayaan 3
Chandrayaan-3 : ...आणि ते हसले! 'चांद्रयान-3'च्या यशस्वी लँडिंगनंतर के. सिवान झाले खुश; पाहा व्हिडिओ
  • फाइन ब्रेकिंग (175 सेकंद)

    लँडर 812 मीटरपर्यंत खाली आला. तिथे तो काही काळ थांबला.लँडरवरील सेन्सरच्या मदतीने चंद्राच्या पृष्ठभागाची पाहणी केली गेली.

  • टर्मिनल डिसेंट-1 (131 सेकंद)

    या टप्प्यात लँडर 149 मीटरपर्यंत खाली आला. पुन्हा तो काही सेकंद थांबला. त्याने पुन्हा पाहणी केली. यावेळी लँडरवरील चार पैकी दोनच इंजिन सुरु होती.

  • टर्मिनल डिसेंट -2 (76 सेकंद)

    हळूहळू खाली उतरत सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांनी लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग केली.

ISRO Moon Mission Chandrayaan 3
ISRO Moon Mission Chandrayaan 3eSakal

रोव्हर आलं बाहेर

चांद्रयान-3 चंद्रावर लँड झाल्यानंतर काही काळ परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर सुमारे तीन ते चार तासांनी प्रज्ञान रोव्हर हे लँडर मॉड्यूलमधून बाहेर पडलं. आता हे रोव्हर चंद्रावरील जमीनीचा अभ्यास करेल.

ISRO Moon Mission Chandrayaan 3
Chandrayaan 3 : पार्टी तो बनती है! 'चांद्रयान-3' मोहिमेच्या यशानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांनी केली धमाल; व्हिडिओ समोर

चांद्रयानाच्या यशाचे शिल्पकार

भारताच्या या यशाचं श्रेय नक्कीच पूर्णपणे इस्रोच्या वैज्ञानिकांचं आहे. या यशात भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष एस.सोमनाथ यांच्यासह ‘चांद्रयान-३’ मोहिमेचे संचालक मोहन कुमार, रॉकेट संचालक बीजू सी. थॉमस यांचा मोठा वाटा आहे.

इस्रो’च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ‘चांद्रयान-३’ या मोहिमेत ५४ महिला अभियंत्या आणि शास्त्रज्ञांचा सहभाग होता. ‘इस्रो’च्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या केंद्रातील विविध विभागांत त्या अधिकारीपदावर काम करीत आहेत.

हा ऐतिहासिक क्षण - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या ब्रिक्स परिषदेसाठी दक्षिण आफ्रिकेत आहेत. त्यांनी तेथूनच या ऐतिहासिक यशासाठी भारतीयांचे आणि इस्रोचे अभिनंदन केले. अखंड भारतासाठी हा महत्त्वाचा आणि नवी चेतना देणारा ठरणारा असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.

ISRO Moon Mission Chandrayaan 3
ISRO Moon Mission Chandrayaan 3eSakal
ISRO Moon Mission Chandrayaan 3
Video: "सोमनाथाचं नाव चंद्राशी जोडलेलं..."; PM मोदींनी अफ्रिकेतून दिल्या ISRO प्रमुखांना खास शुभेच्छा

जगानं केलं कौतुक

या ऐतिहासिक कामगिरीसाठी जगभरातून भारतावर कौतुकाचा वर्षाव झाला. नासाचे अ‍ॅडमिनिस्ट्रेटर बिल नेस्लन, ब्रिटिश स्पेस एजन्सी, युरोपीय स्पेस एजन्सी अशा सर्व संस्थांनी आणि कित्येक देशांनी इस्रोचं आणि देशाचं अभिनंदन केलं.

ISRO Moon Mission Chandrayaan 3
Chandryaan 3 NASA Reaction : 'नासानं कौतुक केलं, पण मनाचा मोठेपणा दाखवला असता तर....' नेटकऱ्यांनी सुनावलं!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.