चांद्रयान-3 मोहीम (Chandrayaan-3 Mission) यशस्वीपणे पार पाडून भारताने नवीन विक्रम केला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. या यशाबद्दल इस्रो आणि आपल्या भारत देशाचे जगभरातून कौतुक होत आहे. दरम्यान या मोहीमेबद्दलच्या नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. नुकतीच नवीन अपडेट्स इस्त्रोनं ट्विटर शेअर केले आहेत.
"रोव्हरच्या हालचाली व्हेरिफाय करण्यात आल्या आहेत. रोव्हरने सुमारे आठ मीटरचे अंतर यशस्वीरित्या पार केले आहे. रोव्हर पेलोड्स LIBS आणि APXS देखील कार्यरत आहेत. प्रोपल्शन मॉड्यूल (propulsion module), लँडर मॉड्यूल (lander module) आणि रोव्हरवरील सर्व पेलोड्स योग्यरित्या कामगिरी करत आहेत", अशी माहिती इस्रोनं ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.
दरम्यान, 24 ऑगस्टला रात्री देखील इस्रोने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. लँडर मॉड्यूल हे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याच्या थोड्या वेळापूर्वीचा हा व्हिडीओ होता.
चांद्रयान-3 मोहीम यशस्वीपणे फत्ते करून भारताने नवा इतिहास रचला आहे. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील चौथा, तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा पहिलाच देश ठरण्याचा विक्रम भारताच्या नावे झाला आहे. चांद्रयान-3 हे चंद्रावर 14 दिवस विविध प्रकारचे संशोधन करणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.