Chandrayaan 3 : चांद्रयान 3 च्या अ‍ॅडव्हान्स्ड कॅमेऱ्याने चंद्र अन् पृथ्वीचे पाठवले फोटो

चांद्रयान ३ चंद्राच्या कक्षा ओलांडत असताना पृथ्वी अन् चंद्राचे फोटो पाठवत आहे.
Chandrayaan 3
Chandrayaan 3esakal
Updated on

Chandrayaan 3 Sent Advanced Images Of Earth And Moon :

इस्रोने पाठवलेले चांद्रयान ३ आता चंद्राच्या कक्षेत फिरत असून तिथून चंद्र आणि पृथ्वीचे फोटो पाठवून खगोलप्रेमींना आनंदाच्या वार्ता देत आहे. चांद्रयान ३ च्या या मोहिमेकडे संपूर्ण जगाच्या नजरा खिळल्या आहेत. त्यामुळे यातून मिळणाऱ्या प्रत्येक अपडेट विषयी सर्वांमध्ये कुतुहल दिसून येत आहे.

आजही इस्रोने या चांद्रयान ३ कडून पाठवण्यात आलेल्या चंद्र आणि पृथ्वीचे फोटो ट्विट केले आहेत.

या ट्विटला अर्ध्यातासात ९७३ वेळा रिट्विट केले गेले आहे. सुमारे साडे पाच हजार लाइक्स मिळाले आहेत, ५९.६ k लोकांनी हे ट्विट बघितले आहे, ४३ वेळा कोट झाले तर १७ बुकमार्क मिळाले आहेत.

चांद्रयान ३ ला पसंती जगभरातून मिळत असल्याने फार कमी वेळात इस्रोच्या या ट्विट्सना लाखात लाइक्स आणि व्हिव्युज मिळतात.

Chandrayaan 3
Chandrayaan 3 : हुरर्रे... चंद्राच्या कक्षेत पोहचलो, फोटो पाठवू का? जेव्हा चांद्रयान ३ विचारतो...

चांद्रयान ३ ने पाठवलेले फोटो

चांद्रयान ३ ने पाठवलेल्या फोटोंमध्ये एक पृथ्वीची तर दुसरी चंद्राची आहे. हे फोटो कोणत्या कॅमेऱ्यांनी काढण्यात आले याचे डिटेल्स या ट्विटमध्ये देण्यात आले आहेत.

इस्रोने केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की,

Chandrayaan-3 Mission:

Earth viewed by Lander Imager (LI) Camera

on the day of the launch

&

Moon imaged by

Lander Horizontal Velocity Camera (LHVC)

a day after the Lunar Orbit Insertion

LI & LHV cameras are developed by SAC & LEOS, respectively https://isro.gov.in/SAC.html

https://isro.gov.in/LEOS.html

चांद्रयान-३ मोहीम: लँडर इमेजर (LI) कॅमेऱ्याने प्रक्षेपणाच्या दिवशी पृथ्वीला टिपले आहे.

आणि लँडर हॉरिझॉन्टल वेलोसिटी कॅमेऱ्याने (LHVC) चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर चंद्राचा फोटो पाठवला आहे.

LI आणि LHV कॅमेरे अनुक्रमे SAC प्रणाली आणि LEOS तंत्रज्ञानाद्वारे विकसित केले आहेत.

Chandrayaan 3
Chandrayaan 3 Update : चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत पोहोचलं चांद्रयान-3; आता फक्त 1437 किलोमीटर बाकी

चांद्रयान ३ चा प्रवास

  • १४ जुलै २०२३ - चांद्रयान ३ चे लाँचिंग

  • ३१ जुलै २०२३ - पृथ्वीच्या पाचही कक्षांच्या फेऱ्या करून चंद्राच्या दिशेने कुच केली. याला ट्रांस लूनर इंजेक्शन म्हटले गेले.

  • ५ ऑगस्ट २०२३ - चंद्राच्या पहिल्या कक्षेत प्रवेश

  • ६ ऑगस्ट २०२३ - दुसऱ्या कक्षेत प्रवेश

  • ९ ऑगस्ट - तिसऱ्या कक्षेत प्रवेश

  • १४ आणि १६ ऑगस्ट २०२३ - चौथ्या आणि पाचव्या कक्षेत प्रवेश

  • १७ ऑगस्ट २०२३ - चांद्रयान ३ चे प्रॉपल्शन आणि लँडर मॉड्यूल वेगवेगळे होतील.

  • १८ आणि २० ऑगस्ट २०२३ - लँडर मॉड्यूलचे डीऑर्बिटिंग होईल.

  • २३ ऑगस्ट २०२३ - लँडर चंद्राच्या दक्षिणी ध्रूवावर लँड करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.