Chandrayaan 3 : 'चांद्रयान-3'च्या लँडिंगसाठी 'एआय'ने केली मदत; विक्रम लँडरने स्वतःच पार पाडली प्रक्रिया

ISRO Moon Mission : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे.
Chandrayaan 3 AI
Chandrayaan 3 AIeSakal
Updated on

Chandrayaan-3 AI : चांद्रयान-3 यशस्वीपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं आहे. यानंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. या लँडिंगसाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांनी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची देखील मदत घेतली होती.

बुधवारी (23 ऑगस्ट) सायंकाळी 6:04 वाजता चांद्रयानाचं लँडर मॉड्यूल हे चंद्रावर उतरलं. यासाठी ऑटोमॅटिक लँडिंग सीक्वेन्सचा वापर करण्यात आला. बंगळुरूमधील मिशन कंट्रोलने लँडिंगची सूचना दिल्यानंतर, विक्रम लँडरने स्वतःच सर्व प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.

Chandrayaan 3 AI
Chandrayaan 3 Landing : चांद्रयान मोहीम यशस्वी होताच महिलांनी केली चंद्राची आरती; राष्ट्रगीत म्हणून भारतमातेचाही केला जयघोष

एआयने केली मदत

विक्रम लँडरची स्थिती, गती आणि अल्टिट्यूड या सर्व गोष्टींना एआय सेन्सर्सच्या माध्यमातून सांभाळण्यात आलं. सोबतच, लँडरची चंद्राच्या पृष्ठभागापासून असणारी उंची मोजण्यासाठी देखील वेगळ्या एआय सेन्सर्सचा वापर करण्यात आला. तर लँडर मॉड्यूलवर असणारे कॅमेरे देखील एआय पॉवर्ड होते.

असा झाला फायदा

या सर्व एआय सेन्सर्सने दिलेल्या डेटामुळे लँडरची लोकेशन ट्रॅक करणं सुलभ झालं. यामुळेच लँडिंग सुरू असताना लाईव्ह फोटोज इस्रोला मिळत होते. इस्रोसोबतच संपूर्ण जग या ऐतिहासिक क्षणाचे थेट प्रक्षेपण पाहू शकला. यामुळेच सामान्य व्यक्तीलाही विक्रम लँडरचा वेग, चंद्राच्या पृष्ठभागापासून त्याची उंची अशा गोष्टी पाहू शकत होते.

Chandrayaan 3 AI
Chandrayaan 3 : पार्टी तो बनती है! 'चांद्रयान-3' मोहिमेच्या यशानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांनी केली धमाल; व्हिडिओ समोर

लँडरने स्वतः घेतले मोठे निर्णय

'चांद्रयान-3'च्या लँडिंगसाठी जागा निवडणे, योग्य जागेचा शोध घेणे, अनुकूल स्थिती नसल्यास पुढे जाऊन नवीन जागा शोधणे, आणि कमांड मिळाल्यानंतर लँडिंगची प्रक्रिया सुरू करणे या सर्व गोष्टी लँडर मॉड्यूलने स्वतःच केल्या. यासाठी देखील एआयची मदत घेण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.