Chandrayaan 3 : 'चांद्रयान-3'च्या लँडिंगसाठी उरले काहीच तास; मिशन कंट्रोलमध्ये उत्साह! इस्रोने पोस्ट करत दिली माहिती

ISRO Moon Mission : 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी चांद्रयान-3 चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करेल.
Chandrayaan 3 Update ISRO Post
Chandrayaan 3 Update ISRO PosteSakal
Updated on

चांद्रयान-3 मोहिमेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. अगदी अंतिम टप्प्यात असलेली ही मोहीम नियोजित वेळेनुसार यशस्वीपणे सुरू असल्याचं इस्रोने स्पष्ट केलं आहे. एका एक्स पोस्टमध्ये इस्रोने याबाबत माहिती दिली. यासोबतच लँडर मॉड्यूलमधील कॅमेऱ्याने टिपलेला चंद्राचा आणखी एक व्हिडिओ इस्रोने पोस्ट केला आहे.

काय सांगितलं इस्रोने?

इस्रोने आपल्या पोस्टमध्ये चांद्रयानाच्या हेल्थबाबत अपडेट दिली आहे. चांद्रयान-3 मोहीम ही नियोजित वेळेनुसार सुरू आहे. सर्व यंत्रणांची नियमित तपासणी सुरू आहे, आणि विक्रम लँडरचा प्रवास अगदी आरामात सुरू असल्याचं इस्रोने म्हटलं आहे.

सोबतच, चांद्रयानाच्या मिशन ऑपरेशन्स कॉम्प्लेक्समध्ये (MOX) अगदी उत्साहाचं वातावरण असल्याचंही इस्रोने सांगितलं.

Chandrayaan 3 Update ISRO Post
Chandrayaan-3 Landing Timing : चांद्रयान-३ चे लँडिंग उद्या झाले नाही तर...; इस्त्रोच्या वैज्ञानिकाने दिली महत्वाची माहिती

शेअर केला नवा व्हिडिओ

यासोबतच इस्रोने या पोस्टमध्ये एक नवीन व्हिडिओही शेअर केला आहे. लँडर पोझिशन डिटेक्शन कॅमेऱ्याने 19 ऑगस्ट रोजी टिपलेला चंद्राचा हा व्हिडिओ आहे. या दिवशी विक्रम लँडर हे चंद्रापासून 70 किलोमीटर उंचीवर होतं.

लँडिंगचं थेट प्रक्षेपण

चांद्रयान-3 हे उद्या (23 ऑगस्ट) चंद्रावर उतरणार आहे. लँडिंगच्या या ऑपरेशनचं थेट प्रक्षेपण हे सायंकाळी 5.20 वाजता सुरू होईल, तसेच 6 वाजून 4 मिनिटांनी लँडिंगची प्रक्रिया पूर्ण होईल; असंही इस्रोने स्पष्ट केलं आहे.

Chandrayaan 3 Update ISRO Post
Chandrayaan 3 Landing : चार टप्प्यांमध्ये होणार 'चांद्रयान-3'चं लँडिंग; शेवटच्या 15 मिनिटांमध्ये काय होईल? जाणून घ्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()