Chandrayaan 3 Update : लँडर-रोव्हर निद्रेत, मात्र अजूनही डेटा पाठवतंय 'चांद्रयान-3' मधील 'हे' उपकरण!

SHAPE Payload : शेप उपकरण हे चंद्रासोबतच सौरमालेच्या बाहेर असणाऱ्या एक्झोप्लॅनेट्सचा देखील अभ्यास करणार आहे.
Chandrayaan 3 SHAPE Payload
Chandrayaan 3 SHAPE PayloadeSakal
Updated on

चांद्रयान-3 मोहीम यशस्वीपणे पार पाडून भारताने मोठी कामगिरी केली आहे. 14 दिवसांची आपली मोहीम संपल्यानंतर चांद्रयान-3 मधील लँडर आणि रोव्हर हे स्लीप मोडवर गेले आहेत. या दोन्हीमधील सर्व उपकरणे बंद असली, तरीही एक उपकरण अजूनही आपल्याला डेटा पाठवत आहे.

स्पेक्ट्रो-पॉलॅरिमेट्री ऑफ हॅबिटेबल प्लॅनेट अर्थ (SHAPE) असं नाव असलेलं हे उपकरण चांद्रयान-3 च्या प्रॉपल्शन मॉड्यूलमध्ये बसवण्यात आलं आहे. लँडर मॉड्यूल चंद्रावर उतरल्यानंतर प्रॉपल्शन मॉड्यूलने चंद्राभोवती फिरण्यास सुरुवात केली होती. गेल्या 52 दिवसांपासून यातील शेप उपकरणाने अत्यंत मोलाची माहिती इस्रोला पाठवली आहे.

Chandrayaan 3 SHAPE Payload
Chandrayaan 3 : भारताचं यश पाहून चीनला पोटदुखी; म्हणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरलंच नाही 'चांद्रयान-3'

शेप उपकरण हे चंद्रासोबतच सौरमालेच्या बाहेर असणाऱ्या एक्झोप्लॅनेट्सचा देखील अभ्यास करणार आहे. जीवसृष्टीच्या विकासासाठी पृथ्वीची जी वैशिष्ट्यं आहेत, तशाच प्रकारची वैशिष्ट्यं असणारा एक्झोप्लॅनेट शोधण्यासाठी याची मदत होणार आहे. आतापर्यंत या उपकरणाने पुरेशी माहिती पाठवली असून, आणखीही कित्येक दिवस हे कार्यरत राहील, असं इस्रोने स्पष्ट केलं.

"शेप हे उपकरण केवळ काही वेळच कार्यरत राहतं. याला कारण म्हणजे, जोपर्यंत ते पृथ्वीवरून स्पष्टपणे दिसत नाही, तोपर्यंत ते वापरता येत नाही. हे उपकरण अशा प्रकारचा डेटा गोळा करत आहे, जो काळानुसार बदलणार नाही. म्हणजेच, एखाद्या एक्झोप्लॅनेटची जी माहिती शेपने दिली आहे, ती आणखी काही वर्षांनंतर देखील लागू होईल." असं इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना स्पष्ट केलं.

Chandrayaan 3 SHAPE Payload
Chandrayaan-3: चांद्रयान-3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर जागे झाले नाहीत तर काय? इस्त्रोने काय म्हटलं..

"या पेलोडने अपेक्षित होता तेवढा डेटा पाठवला आहे. आणखी काही दिवस याचं काम सुरू राहील. मिळालेल्या डेटाचं अ‍ॅनालिसिस करायला आणखी काही महिने लागतील. त्यानंतरच त्यातून जर काही नवीन शोध लागला असेल, तर त्याबाबत घोषणा केली जाईल." असंही सोमनाथ यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.