Chandrayan 4 : चांद्रयान पुन्हा घडवणार इतिहास! इस्रो प्रमुखांनी केला मोठा खुलासा

Chandrayan Update : अंतराळ क्षेत्रात आणखी एका मोठ्या उल्लेखनीय कामगिरीची तयारी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) करत आहे.
ISRO to Send Chandrayaan-4 Parts in Two Launches for Space Assembly
ISRO to Send Chandrayaan-4 Parts in Two Launches for Space Assemblyesakal

ISRO : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 उतरवून इस्रोने आधीच इतिहास रचला आहे आता यानंतर अंतराळ क्षेत्रात आणखी एका मोठ्या उल्लेखनीय कामगिरीची तयारी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) करत आहे. चांद्रयान-४ (Chandrayaan-4) हे या महत्वाकांक्षी मोहिमेचे नाव असून याद्वारे चंद्रावरून नमुने घेऊन येण्याचे नियोजन आहे,अशी माहिती इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी बुधवारी दिली.

चांद्रयान-४ वेगळ्या वेगळ्या भागांमध्ये बनवून अंतराळात पाठवण्यात येणारे जगातील पहिले अंतराळयान असणार आहे. इस्रोच्या सध्याच्या क्षमतेनुसार सर्वात ताकदवान असलेल्या रॉकेटमध्येही चांद्रयान-४ एकाच वेळी पाठवणे शक्य नाही. त्यामुळे या मोहिमेचे दोन टप्पे असतील.

ISRO to Send Chandrayaan-4 Parts in Two Launches for Space Assembly
ISRO Rocket Launch: भारताची अंतराळ क्षेत्रात मोठी झेप! ISRO जुलैमध्ये लाँच करणार सगळ्यात लहान उपग्रह

पहिल्या टप्प्यात प्रक्षेपण यानाचे तीन मुख्य भाग – प्रणोदन (propulsion) модуल, अवरोहण (descender) म्हणजे उतरणारे मॉड्यूल आणि आरोहण (ascender) मॉड्यूल हे LVM-3 यानाद्वारे पाठवले जाणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात PSLV यानाद्वारे transfer मॉड्यूल आणि पुनर्प्रवेश (re-entry) मॉड्यूल अंतराळात पाठवले जाणार आहेत.

अंतराळात या सर्व भागांची जोडणी करून त्यानंतरच चंद्राकडे प्रवास सुरु होईल. या मोहिमेसाठी लागणारी खर्चासह अभ्यास पूर्ण झाला असून लवकरच तो सरकारच्या मान्यतेसाठी पाठवला जाणार आहे.

ISRO to Send Chandrayaan-4 Parts in Two Launches for Space Assembly
Sunita Williams Trapped: सुनीता विल्यम्स धोक्यात! फक्त एवढ्या दिवसांचं इंधन शिल्लक, NASAचं टेन्शन वाढलं

या योजनेसोबतच इस्रो भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक (स्पेस स्टेशन) २०३५ पर्यंत निर्माण करण्याचे आणि २०४० पर्यंत भारतीयांना चंद्रावर पाठवण्याचे ध्येय ठेवून पुढे जात आहे. चांद्रयान-4 ची यशस्विता नक्कीच पूर्ण भारतासाठी अभिमानास्पद असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com