AI Chatbot : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात सध्या मोठी चढाओढ लागली आहे. या स्पर्धेत आघाडी मिळवण्यासाठी OpenAI कंपनी लवकरच आपला नवीन चॅटबॉट ChatGPT-5 लाँच करणार आहे. अंदाजानुसार यंदाच्या जुलै-ऑगस्टमध्ये हा चॅटबॉट मार्केटमध्ये येऊ शकतो.
GPT-4 चॅटबॉट पेक्षा GPT-5 अधिक स्मार्ट आणि सक्षम असणार आहे. त्याची माहितीची क्षमता जास्त असणार आहे. जसे सध्या GPT-4 ला 2021 पर्यंतच्या घडामोडींची माहिती आहे, तर GPT-5 ला 2023 पर्यंतच्या घडामोडींची माहिती असेल. त्याचबरोबर वापरकर्त्यांच्या प्रश्नांची उत्तरे अधिक अचूक आणि विश्वासार्हपणे देण्याची क्षमता त्याच्यात असणार आहे.
GPT-5 फक्त मजकूरच नाही तर भविष्यात व्हिडिओ देखील हाँडल करू शकेल अशी शक्यता आहे. त्याचबरोबर वापरकर्त्यांच्या गरजेनुसार Dall-E 3 इमेज जनरेटर आणि Bing सर्च इंजिन यासारख्या साधनांचा वापरही तो करू शकेल.
OpenAI चा प्रमुख अधिकारी सॅम अल्टमन यांनी अलीकडेच माहिती दिली आहे की, GPT-5 ची ट्रेनिंग सुरु झाली आहे. या ट्रेनिंगमध्ये अनेक टप्पे असणार आहेत. त्यामध्ये सुरक्षिततेची चाचणी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्यांचा समावेश असेल.
GPT-5 चा आपल्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. आपण आपल्या फोनवर वापरणाऱ्या विविध अॅप्स आणि सहायकांमध्ये हा चॅटबॉट कार्यरत असू शकतो. त्यामुळे आपल्याला माहिती मिळवण्यासाठी किंवा एखादे काम करण्यासाठी अधिक सोय होईल.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून तंत्रज्ञानासह आपण खूप सुधारणा केल्या आहेत. नव्या गोष्टी शिकल्या आहेत.हे तंत्रज्ञान आता विकसित होत आहे. त्यामुळे AI वापरण्याचा आपला अनुभव अधिकच सोईचा होणार आहे असं वाटत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.