Sam Altman Fired : 'ChatGPT' बनवणाऱ्या Open AIमध्ये मोठी उलथापालथ; दोन संस्थापक कंपनीतून बाहेर

Open AI Fires CEO Sam Altman : चॅटजीपीटीमुळे सॅम अल्टमन यांना जगभरात ओळख मिळाली होती.
Sam Altman Fired
Sam Altman FiredeSakal
Updated on

Sam Altman Fired as CEO from Open AI : 'चॅटजीपीटी' हे एआय टूल आल्यापासून आर्टिफिशिअल इंटिलिजेन्सबाबत सगळीकडेच चर्चा सुरू झाली होती. हे टूल बनवणाऱ्या कंपनीचे सीईओ आणि को-फाऊंडर सॅम अल्टमन यांनाही जगभरात ओळख मिळाली होती. मात्र, आता कंपनीने सॅम यांची सीईओ पदावरून हकालपट्टी केली आहे. कंपनी बोर्डाला त्यांच्या नेतृत्व कौशल्यावर आता विश्वास राहिला नसल्याचं कंपनीने म्हटलं होतं. यानंतर दुसरे संस्थापक ग्रेग ब्रोकमन यांनीही कंपनीतून राजीनामा दिला आहे.

काय म्हटलं कंपनीने?

"सॅम अल्टमन यांचे सध्या परीक्षण सुरू आहे. ते बोर्डाशी होत असलेल्या संभाषणात ते सातत्याने प्रामाणिक नव्हते. त्यामुळे आपली जबाबदारी पार पाडण्याच्या त्यांच्या क्षमतेस अडथळा निर्माण होत होता. ओपन एआय कंपनीचे नेतृत्व करण्याच्या त्यांच्या क्षमतेत आता बोर्डाला विश्वास नाही." असं कंपनीच्या बोर्डाने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे.

Sam Altman Fired
AI CEO Mika : जगातील पहिली एआय-सीईओ समोर; मस्क-झुकरबर्ग यांच्याहूनही सरस काम, सुट्टीही नाही घेत!

"ओपन एआय कंपनीच्या स्थापनेसाठी आणि वृद्धीसाठी सॅम यांचे भरपूर योगदान राहिले आहे. त्याबद्दल कंपनी बोर्ड कृतज्ञ आहे. मात्र, पुढचा विचार करता नवीन नेतृत्वाची गरज असल्याचंही आम्हाला वाटत आहे", असंही बोर्डाने स्पष्ट केलं.

सॅम यांची प्रतिक्रिया

यानंतर सॅम यांनी एक्स पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. "ओपन एआयमध्ये काम करायला मला आवडलं. यामुळे माझ्यात आणि कदाचित संपूर्ण जगामध्ये देखील काही बदल झाला. याठिकाणी प्रतिभावान लोकांसोबत काम करणं मला सर्वात जास्त आवडलं." अशा आशयाची पोस्ट त्यांनी केली आहे. आता पुढच्या वाटचालीबाबत अधिक सांगायचं आहे, असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं.

ग्रेग ब्रोकमन यांचा राजीनामा

सॅम अल्टमन यांच्या हकालपट्टीच्या बातमीनंतर ओपन एआयचे दुसरे संस्थापक ग्रेग ब्रोकमन यांनीही कंपनीतून राजीनामा दिला आहे. "आठ वर्षांपूर्वी माझ्या अपार्टमेंटमध्ये आपण ही कंपनी सुरू केली होती. त्यानंतर आपण जे काही उभारलं आहे, त्याबद्दल मला खरंच अभिमान आहे. आपण सोबत राहून बरंच काही पाहिलं आणि मिळवलं आहे. आपण काही अशक्य गोष्टी शक्य केल्या. मात्र, आजची बातमी पाहिल्यानंतर मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे." अशा आशयाची पोस्ट त्यांनी केली आहे.

"तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. मानवजातीसाठी एक सुरक्षित आर्टिफिशिअल जनरेटिव्ह एआय बनवण्याच्या मोहिमेवर माझा कायम विश्वास असेल." असंही ते आपल्या पोस्टमध्ये म्हणाले.

Sam Altman Fired
AI Pet Language : पाळीव प्राण्यांचे हावभाव पाहून ओळखता येणार त्यांच्या मनातलं; खास 'एआय' टूल करणार मदत

मिरा मुराती अंतरिम सीईओ

सॅम यांची हकालपट्टी केल्यानंतर आता त्यांच्या जागी मिरा मुराती (Mira Murati) या अंतरिम सीईओ म्हणून कामकाज पाहतील. मिरा यांनी 2018 साली ओपन एआय कंपनीमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. सध्या त्या कंपनीच्या चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर म्हणून काम पाहत होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.