Cheap AC : हा एसी बसवताच विजेचे बिल येईल अवघे तीन बल्ब एवढे! घराला बनवा महाबळेश्वर

सध्या उन्हाळा सध्या जोरात सुरू आहे
Cheap AC
Cheap ACesakal
Updated on

Cheap AC : सध्या उन्हाळा सध्या जोरात सुरू आहे. खोली थंड करण्यासाठी लोक एअर कंडिशनर वापरत आहेत. पण जास्त एसी चालवल्याने वीज बिलही वाढते. पण असे काही एअर कंडिशनरही बाजारात आले आहेत, जे कमी वीज वापरून काही मिनिटांत घर थंड करतात. आज आम्ही तुम्हाला या एसीबद्दल सांगणार आहोत. इतर एअर कंडिशनरच्या तुलनेत हा एसी 60 ते 65 टक्क्यांनी वीज वापर कमी करेल. त्याबद्दल जाणून घेऊ.

Cheap AC
Mental Health : तुमच्या जवळच्यांपैकी कोणाचा स्वभाव स्वतःचं खरं करण्याचा आहे का? सावधान...

ट्युपिक नावाच्या कंपनीने एक अनोखा एअर कंडिशनर विकसित केला आहे जो फक्त बेडची जागा थंड करतो. कंपनीचे संस्थापक रवी पटेल यांनी त्याची रचना केली आहे. यामुळे लोकांना उकाड्यापासून दिलासा तर मिळतोच, पण वीज बिलही कमी होते. या एसीमुळे पर्यावरणाचीही हानी होत नाही. या एसीची किंमत सिंगल बेडसाठी 17,900 रुपये आणि डबल बेडसाठी 19,900 रुपये आहे.

Cheap AC
Technology News : Hero Super Splendor XTEC लॉन्च, जबरदस्त मायलेज आणि फोनशी करता येणार कनेक्ट

Tupik Bed AC ला सुमारे 400W पॉवर लागते. म्हणजेच फक्त तीन बल्ब लावण्यासाठी इतका खर्च येतो. हा एसी सौरऊर्जेनेही चालवता येतो. एसीचा आकार 1 इंच उंच आणि 18 इंच रुंद आहे. तो तंबूत बसवला जातो आणि तंबू बेडवर बसवला जातो. एकदा बसवल्यानंतर, ते काही मिनिटांत बेड एरिया थंड करेल. आत राहूनच तुम्हाला थंड हवा मिळेल.

Cheap AC
Technology News : गुगल आणि मेटाचे हजारो कर्मचारी काम न करता पगार घेत होते

हा एसी 5 अँपिअर सॉकेटद्वारे सहज चालवता येतो. ते बसवण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही मदतीची गरज भासणार नाही. तुम्ही ते स्वतःला अगदी सहजपणे बसवू शकाल. पॉवर कट झाल्यास, तुम्ही हा एसी 1KVA इन्व्हर्टरच्या मदतीने देखील चालवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.