Cheapest 2GB Plan : कोणता रिचार्ज प्लॅन आहे तुमच्यासाठी बेस्ट? वाचा

Cheapest 2GB Recharge Plan
Cheapest 2GB Recharge Plan
Updated on

Cheapest 2GB Recharge Plan : तुमची दररोजची डेटा आणि कॉलसंबंधी गरजा पुर्ण करण्यासाठी डेली 2GB डेटा ऑफर करणारे रिचार्ज प्लॅन बेस्ट ठरतात. कारण त्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी डेटा ऑफर केला जातो आणि त्याच्या किंमती देखील परवडणाऱ्या असतात सोबतच त्यामध्ये इतर अनेक बेनिफिट्स देखील दिले जातात. आज आपण Jio, Vi, Airtel आणि BSNL सारख्या प्रमुख दूरसंचार कंपन्यांकडून दिले जाणारे सर्वात स्वस्त 2GB डेटा प्रतिदिन रिचार्ज प्लॅन पाहाणार आहोत. चला जाणून घेऊ सविस्तर..

Jio Rs 249 ची प्लॅन - डेटा आणि फायदे

Reliance Jio च्या 249 रुपयांचा सर्वात परवडणारा 2GB प्रति दिवस डेटा प्लॅन ऑफर करते. रिचार्ज 24 दिवसांची वैधतेसह येतो, ज्यामुळे एकूण 48GB डेटा मिळतो. डेटा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग 64Kbps पर्यंत खाली येतो. या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंग देखील मिळत आहे. शिवाय, ते Jio Cinema, Jio TV, Jio Cloud आणि Jio Security सारख्या Jio अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळते. Jio च्‍या पोर्टफोलिओमध्‍ये आणखी एक 2GB प्‍लॅन आहे, जो 28 दिवसांची वैधता ऑफर करतो, त्‍याची किंमत 299 रुपये आहे. या प्‍लॅनसह युजरला एकूण 56GB डेटा मिळतो.

Cheapest 2GB Recharge Plan
Infinix Zero 5G फोन भारतात लॉंच; तुमच्या बजेटमध्ये बसेल किंमत

Airtel चा 359 चा प्लॅन - डेटा आणि फायदे

Airtel कडे अनेक डेली 2GB रिचार्ज प्लॅन आहेत आणि सर्वात परवडणारा 359 रुपयांचे रिचार्ज आहे. हा प्लॅन 28 दिवसांची वैधता देतो, ज्यामध्ये एकूण 56GB डेटा मिळतो. दैनिक कोटा संपल्यानंतर, इंटरनेट स्पीड 64 Kbps पर्यंत कमी केला जातो. रिचार्ज दररोज 100 एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंग देखील ऑफर करतो. मोफत 100SMS संपल्यानंतर, वापरकर्त्याकडून प्रति स्थानिक एसएमएस 1 रुपये आणि प्रति एसटीडी एसएमएस 1.5 रुपये आकारले जातील. याव्यतिरिक्त, ते एअरटेल विंक म्युझिक, हॅलो ट्यून्स, अपोलो 24/7 सर्कलचे तीन महिने, शॉ अकादमी क्लाससह अपस्किल्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ मोबाइलचे 30 दिवस आणि FASTag वर 100 रुपयांचा कॅशबॅक देखील मिळतो.

Vodafone Idea चा 359 रुपयांचा प्लॅन - डेटा आणि फायदे

Vi कडील सर्वात स्वस्त 2GB डेली रिचार्ज प्लॅनची ​​किंमत 359 रुपये आहे. यात 28 दिवसांची वैधता, अमर्यादित कॉल्स आणि दररोज 100 SMS मिळतात. डेली डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64 Kbps इतकी होते. प्लॅन वापरकर्त्यांना Vi Movies आणि TV चा फ्री एक्सेस देखील मिळतो. याशिवाय, रात्री12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत फ्री डेटा वापर आणि सोम-शुक्रवार न वापरलेला डेटा शनि-रविवारपर्यंत पुढे वापरता येतो.

Cheapest 2GB Recharge Plan
Maruti घेऊन येतेय पहिली इलेक्ट्रिक कार; किती असेल किंमत? वाचा

BSNL चा 199 रुपयांचा प्लॅन - डेटा आणि फायदे

BSNL 199 रुपयांच्या रिचार्जमध्ये दररोज 2GB डेटा मिळतो. हा प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह येतो, ज्यामुळे एकूण 60GB डेटा मिळतो. डेली डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64 Kbps होईल. रिचार्जमध्ये दररोज 100 एसएमएस आणि अमर्यादित कॉल्स देखील मिळतात. 100SMS कोटा नंतर, वापरकर्त्याकडून 25 पैसे प्रति स्थानिक एसएमएस, 35 पैसे प्रति STD एसएमएस आणि 5 रुपये प्रति आंतरराष्ट्रीय एसएमएस आकारले जातील. BSNL 3G स्पीडने प्लॅन ऑफर करते.

Cheapest 2GB Recharge Plan
50 मेगापिक्सल कॅमेरा अन् 90Hz डिस्प्लेसह रेडमी 10 2022 लाँच

सर्वात स्वस्त 2GB रिचार्ज प्लॅन

कंपनी रिचार्ज किंमत वैधता

जिओ 249 24 दिवस

एअरटेल 359 28 दिवस

वि 359 29 दिवस

बीएसएनएल 199 30 दिवस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()