Cheapest 5g Smartphones: स्वस्त 5G फोन खरेदी करू इच्छिता? बाजारात उपलब्ध आहेत 'हे' सर्वोत्तम पर्याय


cheapest 5g smartphones
cheapest 5g smartphones
Updated on

भारतातील अनेक शहरांमध्ये 5G रोलआउट सुरू झाले आहे आणि वापरकर्त्यांना हाय-स्पीड इंटरनेट सेवा मिळत आहे. जर तुम्हाला 5G सेवा वापरायची असेल तर तुमच्याकडे 5G स्मार्टफोन असणे आवश्यक आहे.जर तुमचे बजेट जास्त नसेल तर तुम्ही कमी किंमतीत 5G फोन देखील खरेदी करू शकता. आज आपण भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असलेले सर्वोत्तम 5G फोन पर्याय जाणून घेणार आहोत.

Moto G51 5G

तुम्ही भारतीय बाजारात उपलब्ध सर्वात स्वस्त 5G फोन म्हणून Moto G51 5G खरेदी करू शकता. त्याचा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट फ्लिपकार्टवरून 12,249 रुपयांना खरेदी करता येईल. Moto G51 5G मध्ये 6.58-इंचाचा 120Hz डिस्प्ले आणि Qualcomm Snapdragon 480+ प्रोसेसर आहे. IP52 रेटिंग असलेल्या डिव्हाइसला 20W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी मिळते.

Poco M4 5G

जर तुम्ही बजेट थोडे वाढवू शकत असाल, तर Poco M4 5G हे बजेट सेगमेंटमधील एक शक्तिशाली 5G डिव्हाइस आहे. 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह त्याचा बेस व्हेरिएंट फ्लिपकार्टवर 13,139 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. फोनचा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट देखील जवळपास 15,000 रुपयांना उपलब्ध आहे. सात 5G बँड सपोर्टसह फोनला 50MP ड्युअल कॅमेरे आणि फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी मिळते.


cheapest 5g smartphones
Nokia G60 5G: लवकरच भारतात येतोय Nokia चा 5G फोन, कमी किंमतीत मिळतील दमदार फीचर्स

Samsung Galaxy F23 5G

सर्वात स्वस्त 5G फोन Galaxy F23 5G दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगने ऑफर केला आहे. या डिव्हाइसचे 4GB आणि 6GB रॅम व्हेरिएंट अनुक्रमे 12,999 रुपये आणि 13,999 रुपयांना खरेदी केले जाऊ शकतात. दोन्हीमध्ये 128GB इंटरनल स्टोरेज उपलब्ध आहे. गोरिला ग्लास 5 संरक्षणासह 120Hz डिस्प्ले व्यतिरिक्त, फोनमध्ये 6,000mAh बॅटरी दिली आहे.

Redmi 11 Prime 5G

परवडणाऱ्या 5G फोनच्या यादीमध्ये Xiaomi चा Redmi 11 Prime 5G देखील आहे, ज्याती बेस व्हेरिएंट (4GB+64GB) साठी किंमत 12,999 पासून सुरू होते.14,999 रुपयांमध्ये 6GB + 128GB व्हेरिएंट खरेदी करण्याचा पर्याय आहे. हा फोन Mediatek Dimensity 700 प्रोसेसर आणि 50MP ड्युअल रियर कॅमेरा सिस्टमसह येतो.


cheapest 5g smartphones
Bharat Jodo Yatra: राहुल गांधींसोबत चालण्यासाठी राज्यातील नेत्यांची 'कसरत'! लक्ष्य 382 किमी

Oppo A74

जर तुम्ही 15,000 रुपयांच्या जवळपास बजेटमध्ये 5G फोन खरेदी करू शकत असाल, तर Oppo A74 5G चा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 14,990 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येईल. यात 6.5-इंचाचा 90Hz डिस्प्ले आणि 48MP ट्रिपल रिअर कॅमेरा दिला आहे. फोनची 5,000mAh बॅटरी 18W चार्जिंग सपोर्टसह येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()