टाटाची सर्वात स्वस्त SUV लाँच, 21 हजार रुपयांत करता येईल बुक

Tata Punch
Tata PunchGoogle
Updated on

टाटा मोटर्सने आपली मायक्रो एसयूव्ही अखेर टाटा पंच (Tata Punch) लॉन्च केली आहे. कंपनीने या दमदार कारची किंमत ही 5.49 लाख रुपयांपासून सरु होते. तर टॉप व्हेरियंटची किंमत ही 9.09 लाखांपर्यंत जाते. ग्राहक ही एसयूव्ही 21 हजार रुपयांना बुक करू शकतात. गाडीची डिलिव्हरी सुद्धा आज पासूनच सुरु झाली आहे.

व्हेरियंट आणि किंमत

ही कार वेगवेगळ्या चार रुपांमध्ये लॉंच करण्यात आली आहे ते म्हणजे जे Pure, Adventure, Accomplished आणि Creative असे आहेत. मॅन्युअल ट्रान्समिशनसह Pure व्हेरियंटची किंमत 5.49 लाख रुपये आहे. एमटी गिअरबॉक्ससह Adventure, Accomplished आणि Creative या प्रकारांची किंमत अनुक्रमे 6.39 लाख, 7.29 लाख आणि 8.49 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. एएमटी व्हेरियंटसाठी तुम्हाला अतिरिक्त 60 हजार रुपये द्यावे लागतील. विशेष गोष्ट म्हणजे या किंमती प्रास्ताविक आहेत, ज्या 31 डिसेंबर 2021 पर्यंत वैध असतील.

Tata Punch
या आहेत देशातील सर्वात सुरक्षित कार; मिळतील बेस्ट सेफ्टी फीचर्स

5 स्टार सेफ्टी रेटिंग

टाटा पंच ही देशातील सर्वात सुरक्षित कार आहे. ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये या कारला 5 स्टार रेटिंग मिळाले आहे. एवढेच नाही तर त्याने भारतातील इतर सर्व कारना मागे टाकले आहे. पंचला अडल्ट सुरक्षा रेटिंगमध्ये 17 पैकी 16.45 गुण मिळले आहेत. त्याचप्रमाणे, मुलांच्या सुरक्षेच्या बाबतीत, या एसयूव्हीने 49 पैकी 40.89 गुण मिळवले आहेत. सुरक्षेसाठी, यात ड्युअल एअरबॅग्स, एबीएस विथ ईबीडी, कॉर्नरिंग फंक्शनसह फ्रंट फॉग लाईट रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, रियर डिफॉगर आणि पंचर रिपेअर किट अशी सुविधा देण्यात आली आहे.

Tata Punch
Kia ने लॉंच केली सर्वात स्वस्त SUV ची स्पेशल एडिशन, पाहा किंमत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()