सेकंड हँड आयफोन घेताय? 'या' गोष्टी नक्की तपासा, अन्यथा होईल नुकसान

आयफोन खरेदी करण्याच वेड सर्वांनाच असतं. परंतु कमी बजेटमुळे ते आयफोन खरेदी करु शकत नाहीत. बजेट जास्त नसल्यामुळे ते ऑनलाईन स्वस्त आयफोन घेण्याच्या विचारात असतात, तर काही लोक सेकंड हँड आयफोन घेण्याच्या विचारात असतात.
iphone
iphonesakal
Updated on

आयफोन खरेदी करण्याच वेड सर्वांनाच असतं. परंतु कमी बजेटमुळे ते आयफोन खरेदी करु शकत नाहीत. बजेट जास्त नसल्यामुळे ते ऑनलाईन स्वस्त आयफोन घेण्याच्या विचारात असतात, तर काही लोक सेकंड हँड आयफोन घेण्याच्या विचारात असतात.

कित्येकदा सेकंड हँड आयफोन खरेदी करणे फायदेशीर सुद्धा ठरते. परंतु कधी कधी सेकंड हँड आयफोन घेताना काही गोष्टी तपासून घ्यायला हव्यात, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. शिवाय, जास्त पैसे आयफोन दुरूस्त करायलाच जाऊ शकतात.

खरेदीचा पुरावा

जेव्हा आपण सेकंड हँड आयफोन खरेदी करतो, तेव्हा विक्रेत्याकडून त्याने आयफोन खरेदी केल्याचा पुरावा आणि बिलाची पावती आपण घ्यायला हवी. आयफोन खरेदी केल्याच्या ओरिजनल पावतीची हार्ड किंवा सॉफ्ट कॉपी आपण घ्यायला हवी. कधी कधी सेकंड हँड आयफोनची वॉरंटी संपलेली नसते, त्यामुळे जर फोनची ओरिजनल पावती मिळाली; तर आपण त्याची वॉरंटी डीटेल्स चेक करु शकतो.

सिरीयल नंबर चेक करणे

वॉरंटी चेक करण्यासाठी पहिल्यांदा आयफोनच्या सेटिंग्जमध्ये जा, तेथे जनरलच्या पर्यायावर क्लिक करा, त्यानंतर अबाऊटवर क्लिक करा. तेथे तुम्ही आयफोनचा सीरियल नंबर चेक करु शकता. आयफोनचा सीरियल नंबर कॉपी करुन checkcoverage.apple.com या वेबसाईटवर तो टाकून तुम्ही तुमच्या आयफोनची माहिती चेक करु शकता.

बॅटरीवर द्या विशेष लक्ष

कोणत्याही आयफोनसाठी त्याची बॅटरी हेल्थ खुप महत्त्वाची असते. आयफोनची बॅटरी हेल्थ चेक करण्यासाठी आयफोनच्या सेटिंगमध्ये जा. त्यानंतर बॅटरीच्या पर्यायावर क्लिक करा. तेथे बॅटरी हेल्थ आणि चार्जिंगवर क्लिक करा. जर तुम्ही बॅटरी हेल्थ चेक करु शकत नसाल, तर तो आयफोन नकली असण्याची शक्यता आहे.

iphone
iPhone Camera Module : चीनचा बाजार उठणार? टायटन अन् मुरुगप्पा ग्रुप भारतात बनवू शकतात आयफोनचे कॅमेरे; रिपोर्टमध्ये दावा

डिस्प्लेबद्दल घ्या माहिती

आयफोनचा डिस्प्ले अनऑफिशयल सर्व्हिस सेंटरवर रिप्लेस किंवा रिपेयर केला आहे की नाही याची माहिती तुम्ही खूप सोप्या पद्धतीने चेक करु शकता. हे चेक करण्यासाठी तुम्ही आयफोनच्या सेटिंगमध्ये जा. डिस्प्ले आणि ब्राइटनेसवर क्लिक करा आणि आप ट्रू टोन एक्टिव करा. जर ते एक्टिव होत नसेल तर आयफोन रिपेयर केलेला असू शकतो.

जर तुम्ही या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आयफोन खरेदी कराल, तर तुम्हाला कोणत्याही नुकसानाचा सामना करावा लागणार नाही. त्याशिवाय तुम्ही आयफोनची बॉडी सुद्धा चेक करायला हवी, जेणेकरुन बॉडीवर कोणत्याही प्रकारचा तडा गेलेला नसावा. एखादा सेकंड हँड आयफोन खरेदी करताना तुम्ही या सर्व बाबींचा विचार करणं गरजेचं आहे.

iphone
Fake iPhone Scam : फेक आयफोन बनवून ३ भावांनी चक्क अ‍ॅपल कंपनीला लावला ५० कोटींचा चुना; असा रचला कट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.