Instagram Phishing Scams: ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकरणात सातत्याने वाढ होत आहे. सायबर गुन्हेगार फसवणुकीसाठी वेगवेगळे मार्ग शोधत आहेत. आता अशीच एक घटना समोर आली असून, यात महिलेला ७ लाख रुपये गमवावे लागले आहे. चेंबूर येथे राहणाऱ्या एका ४२ वर्षीय महिलेची सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर फसवणूक झाली आहे.
हेही वाचाः काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??
या महिलेची इंस्टाग्रामवर Ignatius Enwenye नावाच्या एका व्यक्तीशी ओळख झाली होती. या व्यक्तीने महिलेला अमेरिकन उद्योगपती असल्याचे सांगितले होते. सप्टेंबर महिन्यापासून दोघांमध्ये इंस्टाग्रामवरून बोलणे सुरू होते. या दरम्यान व्यक्तीने महिलेला त्यांच्यासाठी गिफ्ट पाठवत असल्याचे सांगितले. यानंतर दोन दिवसांनी महिलेला एक फोन आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने दावा केला की, ती दिल्लीच्या कस्टम डिपार्टमेंटमधून बोलत आहे. तसेच, महिलेच्या नावाने ३० हजार डॉलर्सचे (जवळपास २४ लाख रुपये) गिफ्ट विमानतळावर आले आहे.
पैशांची केली मागणी
हे गिफ्ट इंस्टाग्रामवरून मैत्री झालेल्या Enwenye नावाच्या व्यक्तीने पाठवले असल्याचे महिलेला वाटले. याबाबत विचारले असता Enwenye देखील आर्थिक मदत म्हणून हे गिफ्ट पाठवल्याचे त्याने सांगितले. तसेच, गिफ्ट क्लिअरेंसच्या नावाखाली कॉल करत महिलेकडे २५ हजार रुपयांची मागणी देखील करण्यात आली.
या मागणीनंतर महिलेने गुगल पे वरून पैसे पाठवले. परंतु, त्यानंतर देखील वेगवेगळी कारणे सांगत कॉलवरून पैशांची मागणी होऊ लागली. पैसे उकळल्यानंतर व्यक्तीने फोन उचलने देखील बंद केले. अखेर महिलेने फसवणुकीबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ
गेल्याकाही महिन्यात अशाप्रकारच्या ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी सावध राहणे गरजेचे आहे. तुमच्या एका चुकीमुळे बँक खाते रिकामे होऊ शकते. सोशल मीडियावरून भेटलेल्या अथवा इतर कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी खासगी माहिती शेअर करणे धोकादायक ठरू शकते. गिफ्टच्या नादात कोणालाही पैसे पाठवू नये.
अनेकदा, लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून देखील पैशांची मागणी केली जाते. त्यामुळे अशा फेक कॉल्स आणि मेसेजपासून सावध राहणे गरजेचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.