चीनचे वैज्ञानिक कायम वेगवेगळे प्रयोग करत असतात. काही दिवसांपूर्वीच चीनने पृथ्वीच्या मध्यभागापर्यंत जाण्यासाठी खड्डा खणण्यास सुरुवात केली होती. आता मात्र चीन जगातील सर्वात मोठा अंडरवॉटर टेलिस्कोप बनवत आहे. ट्रायडंट नावाचा हा टेलिस्कोप चीन समुद्रात तयार करत आहे.
समुद्रामध्ये 11,500 फूट खोलीवर हा टेलिस्कोप बसवण्यात येणार आहे. ही मोहीम 2026 साली सुरू करण्यात येईल, तसेच 2030 पर्यंत हा टेलिस्कोप बांधून तयार करण्याचा चीनचा उद्देश्य आहे. अशी मोहीम राबवणारा चीन हा पहिलाच देश ठरणार आहे.
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, चीन न्यूट्रिनोच्या अभ्यासासाठी हा टेलिस्कोप उभारत आहे. यांना घोस्ट पार्टिकल्स म्हणूनही ओळखलं जातं. जगात सर्व गोष्टींमध्ये हे पार्टिकल्स आढळतात. अगदी आपल्या शरीरातून देखील हे घोस्ट पार्टिकल्स प्रवास करत असतात. आपल्या ब्रह्मांडात आळणाऱ्या फोटॉन्सनंतर सर्वाधिक आढळणारे अॅटोमिक कण म्हणजे न्यूट्रिनो असतात.
या कणांची निर्मिती विश्वाच्या निर्मितीपासूनच झाली आहे. तेव्हापासून हे कण अस्तित्वात आहेत. एका व्यक्तीच्या शरीरातून प्रत्येक सेकंदाला सुमारे 1000 कोटी वेळा न्यूट्रिनो प्रवास करतात. जगातील सर्व सजीवांच्या शरीरातून हे कण प्रवास करतातच. यांचा अभ्यास केल्यामुळे विश्वाची निर्मिती, अंतराळातील विस्फोट आणि इतर कित्येक गोष्टींबाबत माहिती मिळण्याची शक्यता आहे. (Tech News)
ट्रायडेंट टेलिस्कोपमध्ये 24,000 पेक्षा अधिक ऑप्टिकल सेन्सर लावण्यात येणार आहेत. तसेच समुद्रात याला स्थिर ठेवण्यासाठी 1,211 तारांचा वापर केला जाईल. या सर्व तारांची लांबी 2.300 फूट असणार आहे. आपल्या आजूबाजूच्या 7.5 क्युबिक किलोमीटर परिसरातील न्यूट्रिनोंचा शोध घेण्याची क्षमता या टेलिस्कोपमध्ये असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.