China Moon Mission : चीनचे Chang'e-6 मिशन यशस्वी ; जाणून घ्या चंद्रावरच्या कोणत्या वस्तू घेऊन येणार यान

Chang'e-6 Mission : चीन ठरला चंद्राच्या पलिकडून मातीचे नमुने आणणारा पहिला देश
China's Chang'e-6 Lifts Off with Far Side Lunar Samples
China's Chang'e-6 Lifts Off with Far Side Lunar Samplesesakal
Updated on

China Mission Moon : चीनने अंतरिक्षाच्या क्षेत्रात आणखी एक मोठी झेप घेतली आहे. चीनच्या Chang'e-6 या अंतरिक्षयानाने चंद्राच्या पलिकडून मातीचे नमुने घेऊन यशस्वीपणे उड्डाण केले आहे. जून २-३ रोजी मातीचे नमुने गोळा करण्याचे काम पूर्ण केल्यानंतर मंगळवारी सकाळी ७:३८ वाजता (भारतीय वेळेनुसार रात्री ११:३८) Chang'e-6 चांद्राच्या पृष्ठभागावरून निघाले.

हे यश चीनला चंद्राच्या पलिकडून मातीचे नमुने आणणाऱ्या पहिल्या देशाचा मान मिळवून देण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. चंद्राच्या पलीकडचा प्रदेश हा अद्यापही फारसा शोधला गेलेला नाही. तिथून आणलेल्या या मातीच्या नमुन्यांचे विश्लेषण करून चंद्राच्या उत्पत्ती आणि निर्मितीबद्दलच्या आपल्या ज्ञानात भर पडण्याची शक्यता आहे.

China's Chang'e-6 Lifts Off with Far Side Lunar Samples
AI Teacher : या AI शिक्षिकेने जिंकलं विद्यार्थ्यांचं मन ; निती आयोगाचा प्रकल्प आसाममध्ये लाँच

Chang'e-5 या त्यांच्या आधीच्या मोहिमेपेक्षा Chang'e-6 ची मोहीम अधिक आव्हानात्मक होती. Chang'e-5 ने चंद्राच्या जवळच्या बाजूवरून मातीचे नमुने गोळा केले होते. मात्र, Chang'e-6 चंद्राच्या पलिकडून काम करत असल्याने पृथ्वीवरील नियंत्रण कक्षांशी थेट संपर्क साधू शकत नव्हते.

या अडथळ्यावर मात करण्यासाठी चीनच्या अंतरिक्ष संशोधन संस्थेने (CNSA) एप्रिलमध्ये प्रक्षेपित केलेल्या ‘क्वेचियाओ-२’ या रिले उपग्रहाचा आधार घेतला. हा उपग्रह Chang'e-6 आणि पृथ्वी यांच्यातील संवादासाठी दुवा म्हणून काम करतो.

ड्रिल आणि रोबोटिक हाताने सुसज्ज असलेल्या Chang'e-6 ने चांद्राच्या पृष्ठभागावरून आणि पृष्ठभागाखालील मातीचे बारकाईने नमुने गोळा केले. हे नमुने गोळा केल्यानंतर चीनने एक भावनिक क्षण अनुभवला. बीजिंग डेली वृत्तपत्राच्या वृत्तानुसार Chang'e-6 ने प्रथमच चांद्राच्या पलिकडे चीनचा राष्ट्रीय ध्वज फडकावला.

China's Chang'e-6 Lifts Off with Far Side Lunar Samples
China Moon Mission : चंद्रावरची माती आणि खडक पृथ्वीवर येणार? चीनचं 'हे' यान चंद्राच्या पाठीमागील भागावर लँड

सध्या चंद्राच्या कक्षेत असलेले Chang'e-6 आणखी एका अंतरिक्षयानाशी भेट घेऊन या मौल्यवान मातीच्या नमुन्यांचे तेथील ‘रिटर्न मॉड्यूल’मध्ये निश्चित स्थान करेल. हे ‘रिटर्न मॉड्यूल’ जून २५ च्या आसपास चीनच्या आतील मंगोलिया प्रदेशात उतरण करेल.

चंद्राच्या पलिकडून आणलेल्या या मातीच्या नमुन्यांच्या विश्लेषणाची जगभरातील शास्त्रज्ञ आतुरतेने वाट पाहात आहेत. या मातीच्या विश्लेषणातून आपल्या सूर्यमालेच्या निर्मितीबद्दल अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.