Chinese Gaming Apps : लहान मुलांच्या गेमिंग अ‍ॅप्समधून चीन चोरतंय भारतीयांची खासगी माहिती; पाहा संपूर्ण यादी

आपली मुलं शांत बसावीत म्हणून कित्येक पालक त्यांना मोबाईलवर गेम्स लावून देतात. मात्र, काही चिनी गेमिंग अ‍ॅप्स या मोबाईलमधील डेटा चोरत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
Chinese Gaming Apps
Chinese Gaming AppseSakal
Updated on

Kids Gaming Apps Stealing Data : भारतीयांची खासगी माहिती चोरणाऱ्या कित्येक चिनी अ‍ॅप्सवर आतापर्यंत सरकारने कारवाई केली आहे. यामध्ये ByteDance कंपनीच्या टिकटॉक अ‍ॅपचं नाव प्रामुख्याने समोर येतं. मात्र, सरकारच्या कारवाईनंतर देखील कित्येक चिनी अ‍ॅप्स हे अजूनही लोकांची खासगी माहिती चोरत असल्याचं समोर आलं आहे.

विशेष म्हणजे, हे अ‍ॅप्स लहान मुलांचे गेमिंग अ‍ॅप्स (Kids Gaming Apps) आहेत. आपली मुलं शांत बसावीत म्हणून कित्येक पालक त्यांना मोबाईलवर गेम्स लावून देतात. मात्र, काही चिनी गेमिंग अ‍ॅप्स या मोबाईलमधील डेटा चोरत असल्याचं स्पष्ट झालं आहे. एबीपीने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

प्रायव्हसी रिसर्च फर्म Incogni ने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील 11 डेटा हंग्री अ‍ॅप्सपैकी (Data Hungry Apps) तीन अ‍ॅप्स या लहान मुलांच्या गेम्स आहेत. हे तिन्ही अ‍ॅप्स BabyBus कंपनीचे आहेत. हे तीन अ‍ॅप्स पुढीलप्रमाणे -

  • Baby Panda World : Kids Games (एक कोटींहून अधिक डाऊनलोड)

  • BabyBus Kids : Video & Game World (10 मिलियन डाऊनलोड)

  • Baby Panda's Kids Play (10 मिलियन डाऊनलोड)

Chinese Gaming Apps
Video Game : आता व्हिडिओ गेम करणार मुलांचा मानसिक इलाज, कंपनीचा मोठा दावा; अमेरिका सरकारने दिली परवानगी

2023 च्या तिसऱ्या क्वार्टरमध्ये समोर आलेल्या आकडेवारीनुसार, आशियामध्ये डाऊनलोड झालेल्या एकूण लहान मुलांच्या गेम्समध्ये BabyBus कंपनीच्या अ‍ॅप्सचा वाटा तब्बल 60 टक्के होता. यावरुनच लक्षात येतं की कोट्यवधी लोकांच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप्स आहेत. (Chinese Apps)

इकॉनॉमिक टाईम्सने या अ‍ॅप्सची तपासणी केल्यानंतर त्यातून धक्कादायक माहिती समोर आली. हे अ‍ॅप्स मोबाईलची इन्फर्मेशन, आयडी, अ‍ॅप इन्फर्मेशन, परफॉर्मन्स, फायनॅन्शिअल इन्फर्मेशन, पर्चेस हिस्ट्री, ईमेल आयडी, यूजर आयडी आणि इतर सेन्सिटिव्ह माहिती गोळा करत असल्याचं यात स्पष्ट झालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.