YouTube Fake View Scam : जगातील सर्वात मोठा व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म म्हणजे यूट्यूब. आपल्या कंटेंट क्रिएटर्सना यूट्यूब जाहिरातींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसे मिळवून देतं. मात्र त्यासाठी तुमच्या व्हिडिओंना ठराविक प्रमाणात लाईक्स आणि व्ह्यूज मिळायला हवेत.
आपल्या यूट्यूब व्हिडिओंचे लाईक्स वाढावेत यासाठी लोक ते मित्रांसोबत शेअर करतात, किंवा मग काही लोक फेक अकाउंटही उघडतात. मात्र, चीनमधील एका पठ्ठ्याने यासाठी तब्बल 4,600 मोबाईल खरेदी केल्याचं समोर आलं आहे.
चीनमधील वांग नावाच्या एका व्यक्तीने हा कारनामा केला आहे. आपल्या लाईव्ह स्ट्रीमिंग व्हिडिओंवरील व्ह्यूज वाढवण्यासाठी त्याने 4,600 मोबाईलचा वापर केला. अशा प्रकारे त्याने केवळ चार महिन्यांमध्येच तब्बल 3.48 कोटी रुपये कमावले. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने याबाबतची माहिती दिली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, वांगने आपलं यूट्यूब चॅनल 2022 साली सुरू केलं होतं. मात्र त्याचे व्ह्यूज जास्त वाढत नव्हते. अशात त्याच्या मित्रांनी त्याला फेक व्ह्यूज वाढवण्याच्या पद्धती सांगितल्या. यानंतर वांगने एवढ्या मोठ्या संख्येने फोन खरेदी केले. एखा खास क्लाऊड सॉफ्टवेअरच्या मदतीने तो हे फोन एकाच वेळी ऑपरेट करू शकत होता. व्हीपीएनच्या मदतीने तो या सगळ्या मोबाईलची लोकेशनही वेगवेगळी दाखवत होता.
या व्यक्तीचं बिंग फुटल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याचा सगळा सेटअप पाहिल्यानंतर पोलीस देखील चक्रावले. न्यायालयाने या व्यक्तीला 15 महिने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. यासोबतच वांगला तब्बल 7,000 डॉलर्सचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.