Chinese Spy Balloon : चीन कोणत्या ना कोणत्या कारणावरुन सतत चर्चेत येत असतं. सध्या एका Spy Balloon ची जोरदार चर्चा सुरू आहे. अमेरिकेत आकाशात स्पाय बलून दिसून आला ज्याच्या फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. याला चीनचा स्पाय बलून म्हटले जात आहे. हा बलून अमेरिकेच्या उत्तर-पश्चिम क्षेत्रात उडताना दिसून आला.
विशेष म्हणजे हा चिनी स्पाय बलून अमेरिकेच्या त्या क्षेत्रात दिसून आला ज्या क्षेत्रात अमेरिकेचा एअरबेस आणि स्ट्रॅटेजिक मिसाइल आहे. (Chinese Spy Balloon flying high over the United States america viral video read story)
अमेरिकेत दिसून आला स्पाय बलून
न्यूज एजेंसी एएफपीनुसार अमेरिकेत आकाशात एक चीनी स्पाय बलून अचानक उडताना दिसला. जो एअरबेस आणि स्ट्रॅटेजिक मिसाइल ज्या जागी असतात अशा संवेदनशील क्षेत्रात उडत होता. अमेरिकेच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की अमेरिकी सैनिक बलूनला खाली पाडण्याचा विचार करत होते मात्र त्यांना या गोष्टीची भीती होती की यामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
हा बलून अमेरिकेच्या उत्तर-पश्चिम क्षेत्रात उडताना दिसून आला. जिथे संवेदनशील एअरबेस आणि स्ट्रॅटेजिक मिसाइल आहे. एएफपीच्या मते "स्पष्टपणे या बलूनद्वारे अमेरिकेवर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न होता. माहिती गोळा करण्यासाठी हा बलून पाठवण्यात आल्याचं अमेरिकेतील अधिकाऱ्यांचे म्हणणं होतं.
अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या बलूनने अमेरिकेच्या संवेदनशील भागात प्रवेश केला होता. अधिकाऱ्यांनी यावर चर्चाही केली की यावर अॅक्शन घेऊया मात्र लोकांच्या सुरक्षेचा विचार करुन या बलूनवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.अमेरिकेत असा स्पाय बलून दिसणे ही पहिली वेळ नाही तर याआधीही चीन ने अमेरिकेत स्पाय बलून पाठवलेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.