पुणे : देशातील पहिली सिट्रॉएन बेसाल्ट एसयूव्ही लाँच करण्यात आली आहे. त्याची विक्री सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून देशातील सर्व शोरूममधून सुरू होईल, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली.
नवीन स्टेलांटिस इंडियाचे सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर शैलेश हजेला म्हणाले, ‘‘आम्हाला सिट्रॉएन बेसाल्ट अधिकृतपणे लाँच करताना अभिमान वाटतो. नावीन्यपूर्ण उत्तम वाहने प्रदान करण्याची वचनबद्धता यातून दिसते. बेसाल्टचे वैशिष्ट्यपूर्ण एसयूव्ही कूपे डिझाइन, आधुनिक तंत्रज्ञानाचे भारतीय ग्राहकांकडून कौतुक होईल. यासाठी आम्हाला खूप चांगले बुकिंग मिळाले आहे. अधिकाधिक ग्राहकांना ते आवडेल, अशी अपेक्षा आहे.’’
डीलर आर. के. शर्मा म्हणाले, ‘‘आम्ही डायनॅमिक एसयूव्ही कूपे डिझाइन, प्रगत वैशिष्ट्ये आणि आमच्या ग्राहकांसाठी उत्कृष्ट सोयीसह नवीन सिट्रॉएन बेसाल्ट प्रदर्शित करण्यास उत्साही आहोत. सिट्रॉएनची उच्चस्तरीय अनुभवाची वचनबद्धता पुणे शहरापर्यंत आणण्यात आम्हाला अभिमान वाटतो. सिट्रॉएन बेसाल्ट ग्राहकांच्या पसंतीस उतरेल, अशी आम्हाला खात्री आहे.’’ ब्रँड डायरेक्टर शिशिर मिश्रा म्हणाले, ‘‘सिट्रॉएन बेसाल्ट देशात नवीन मानके प्रस्थापित करेल. एक अत्याधुनिक आणि ॲक्सेसेबल ड्रायव्हिंगचा अनुभव देईल.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.