LED Screen Cleaning: घरगुती वस्तूंनी LED स्क्रीन करा स्वच्छ, फक्त करू नका 'या' चुका

LED Screen Cleaning: तुमची एलईडी स्क्रीन स्वच्छ आणि चमकदार ठेवण्यासाठी घरगुती गोष्टींचा वापर करू शकता.
LED Screen Cleaning
LED Screen CleaningSakal
Updated on

LED Screen Cleaning: एलईडी स्क्रिनची स्वच्छता करणे गरजेचे आहे. पण त्याची योग्य पद्धत माहिती असणे आवश्यक आहे. तुम्ही जर चुकीच्या वस्तू वापरल्यात तर स्क्रीन खराब होऊ शकते. यामुळे पुढील काही घरगुती पद्धतींनी एलईडी स्कीनची स्वच्छता करू शकता.

मायक्रोफायबर कापड

सक्रीन स्वच्छ करण्यासाठी मायक्रोफायबर कापड वापरू शकता. यासाठी सर्वात आधी एक मायक्रोफायबर कापड घ्यावा. हे कापड नाजूक स्क्रीनसाठी सर्वोत्तम आहे. कारण त्यामुळे ओरखडे पडत नाही. स्क्रीनवर साचलेली धूळ हळूवारपणे पुसून टाका.

डिस्टिल्ड वॉटर

डिस्टिल्ड वॉटर वापरून स्कीन स्वच्छ करू शकता. स्प्रे बाटलीत थोडे पाणी टाकून कापडावर हलके फवारावे.  कापड जास्त ओले नसावे. आता या ओल्या कपड्याने स्क्रीन हलक्या हाताने स्वच्छ करा.

LED Screen Cleaning
Car Care: कडक उन्हात कार आतील बाजूस थंड ठेवण्यासाठी आजच करा 'या' 5 गोष्टी

कॉटन बड्स

एलईडी स्क्रीन स्वच्छ करण्यासाठी कॉटन बड्सचा वापर करू शकता.  स्क्रीनच्या कडा आणि कोपरे स्वच्छ करण्यासाठी कॉटन बड्स वापरू शकता. ते हलके ओले करा आणि हळूवारपणे कोपरे स्वच्छ करा.

पुढील गोष्टी ठेवा लक्षात

कधीकधी स्क्रीनच्या लहान कोपऱ्यांमध्ये धूळ जमा होते. ते काढण्यासाठी मऊ ब्रश वापरा. हा ब्रश धूळ पूर्णपणे काढून टाकेल. एलईडी स्कीन स्वच्छ करताना हाय केमिकलचा वापर टाळावा. कोरड्या किंवा अस्वच्छ कपड्याने स्क्रीन स्वच्छ करू नका. यामुळे स्क्रीनवर ओरखडे पडू शकतात. तसेच अति पाणी वापरणे टाळावे. पाणी आत गेल्यास डिव्हाइस खराब होऊ शकते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()