Chinese Scientists Cloned Monkey : चीनच्या वैज्ञानिकांनी एक मोठी घोषणा केली आहे. एका रीसस माकडाचे यशस्वी क्लोनिंग केल्याचा दावा या वैज्ञानिकांनी केला आहे. क्लोनिंगच्या माध्यमातून तयार करण्यात आलेलं हे माकड आता दोन वर्षांचं झालं आहे. रेट्रो असं या माकडाचं नाव आहे. (ReTro Monkey)
1996 साली काही वैज्ञानिकांनी पहिल्यांदाच एका प्राण्याचा यशस्वी क्लोन तयार केला होता. डॉली नावाच्या एका बकरीचा क्लोन बनवण्यासाठी वैज्ञानिकांनी सोमॅटिक सेल न्यूक्लिअर ट्रान्सफर (SCNT) नावाच्या टेक्निकचा वापर केला होता. याच टेक्निकमध्ये थोडाफार बदल करून आता चीनच्या वैज्ञानिकांनी रेट्रो माकडाचा क्लोन बनवला आहे.
1996 नंतर जगभरातील वैज्ञानिकांनी सुमारे 20 हून अधिक जनावरांचं क्लोनिंग केलं आहे. अगदी भारतात देखील 2009 साली एका म्हशीचं क्लोनिंग करण्यात वैज्ञानिकांना यश मिळालं होतं. मात्र, माकडाचं यशस्वी क्लोनिंग करण्याची ही पहिलीच वेळ आहे. नेचर या नियतकालिकात याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. (Animal Cloning)
वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या तंत्रज्ञानामुळे प्रायमेट प्रवर्गातील प्राण्यांचं क्लोनिंग करणं शक्य होणार आहे. क्लोनिंग करुन तयार केलेल्या माकडांचा औषधांच्या चाचणीसाठी वापर करता येऊ शकतो; असं मत चायनीज अकॅडमी ऑफ सायन्समधील न्यूरोसायन्स विभागाचे संचालक मु-पिंग पू यांनी व्यक्त केलं.
यापूर्वी 2018 साली चीनमधील वैज्ञानिकांनी एका मॅकाकेस माकडाचं क्लोनिंग करण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये हुआ हुआ आणि जोंग जोंग या दोन जुळ्या माकडांचा जन्म झाला होता. यासाठी SCNT याच जुन्या टेक्निकचा वापर करण्यात आला होता.
या प्रयोगावेळी वैज्ञानिकांनी 109 क्लोन्ड एंब्रियो बनवले होते. त्यांपैकी 21 सरोगेट माकडांमध्ये इम्प्लांट केले होते. यांपैकी केवळ सहा माकडे प्रेग्नंट झाली, आणि त्यापैकीही केवळ दोघांचाच जन्म झाला होता. (First Cloned Primate)
यानंतर वैज्ञानिकांनी SCNT टेक्निकमधील त्रुटींचा अभ्यास सुरू केला. या टेक्निकमध्ये सुधारणा करुन, प्लॅसेंटा बनवणाऱ्या पेशींमध्येच बदल केला. ट्रोफोब्लास्ट नावाच्या या पेशी एका हेल्दी माकडाच्या शरीरातून घेण्यात आल्या. या पेशी भ्रूणाच्या विकासासाठी आवश्यक पोषक तत्वे पुरवतात. यामुळे भ्रूणाला ऑक्सिजन आणि इतर गरजेचे घटक मिळतात.
या टेक्निकमध्ये सुधारणा केल्यामुळे एंब्रियोंना नैसर्गिक प्लॅसेंटा विकसित करण्यास मदत मिळाली, अशी माहिती झेन लिऊ या वैज्ञानिकाने दिली. लिऊ हे चायनीज अकॅडमी ऑफ सायन्स येथे न्यूरोसायन्टिस्ट आहेत. नेचर या जर्नलमध्ये याबाबत रिसर्च प्रसिद्ध करण्यात आला आहे.
या शोधाबाबत जगभरातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. स्पॅनिश नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी याठिकाणी कार्यरत असणारे लुईस मोंटोलियू यांनी यामधील नैतिकतेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणतात, की या प्रयोगामध्ये 113 भ्रूणांपैकी केवळ एकच जिवंत राहिलं आणि एवढं मोठं झालं आहे. म्हणजे याचा सक्सेस रेट एक टक्क्यापेक्षाही कमी आहे. लुईस हे चीनमधील संशोधनाचा भाग नव्हते.
"अजून माकडाच्या एकाच प्रजातीचं क्लोनिंग झालं आहे. माणसांचं क्लोनिंग करण्यापूर्वी आपल्याला माकडांच्या आणखी प्रजातींचं क्लोनिंग करण्याची गरज आहे. अर्थात, माणसांचं क्लोनिंग हे गरजेचं नाही, तसंच ते अनैतिक देखील आहे. याचा प्रयत्न करणंही खूप अवघड असणार आहे.." असं मत लुईस यांनी व्यक्त केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.