CNG Car Tips : कारमध्ये CNG असेल तर काळजी घ्या, या गंभीर चुका टाळा

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्यामुळे सीएनजी कारची मागणी वाढली
CNG Car Tips
CNG Car Tipsesakal
Updated on

CNG Car Tips : पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्यामुळे सीएनजी कारची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत दररोज पेट्रोल आणि डिझेलचा खर्च टाळण्यासाठी लोक सीएनजी कार वापरण्यास प्राधान्य देतात. सीएनजी असलेल्या कारला सामान्य कारपेक्षा जास्त देखभालीची आवश्यकता असते.

CNG Car Tips
Technology Tips : भूकंप, महापूर आणि त्सुनामीपूर्वी फोनवर मिळणार अलर्ट, या तंत्रज्ञानामुळे वाचणार जीव

अशा वेळी तुमचा थोडीसाही निष्काळजीपणाही तुमच्या डोक्याला ताप ठरू शकतो. आज आम्ही तुम्हाला सीएनजी कारमध्ये कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे सांगणार आहोत. जर तुम्ही या गोष्टींची काळजी घेतली नाही तर ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.

CNG Car Tips
Technology News : गुगल आणि मेटाचे हजारो कर्मचारी काम न करता पगार घेत होते

सीएनजी मोडवर इंजिन सुरू करू नका : जर तुम्ही सीएनजी कार वापरत असाल तर तुम्ही लक्षात ठेवा की कार कधीही सीएनजी मोडवर सुरू करू नये. अशा स्थितीत गाडी काही काळ पेट्रोल मोडवर चालवल्यानंतर ती सीएनजी मोडवर चालवा.

CNG Car Tips
Samsung Galaxy M54 : 108 मेगा पिक्सेल स्मार्टफोन बाजारात दाखल

स्पार्क प्लगची देखभाल : स्पार्क प्लग अनेकदा लवकर खराब होतो. अशा परिस्थितीत त्यांच्या नियमित देखभालीकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या कारमध्ये पेट्रोल आधारित स्पार्क प्लग देखील वापरू शकता. हा प्लग वेळोवेळी तपासत राहणे आवश्यक आहे.

CNG Car Tips
Health Tips : खरंच चहा-कॉफी पिल्याने वजन कमी होतं?

सीएनजी कार उन्हात पार्क करू नका : सीएनजी इतर इंधनांच्या तुलनेत जास्त उष्ण तापमानात अधिक वेगाने बाष्पीभवन होते. तुमची कार उन्हात पार्क न करण्याचा प्रयत्न करा. उन्हात गाडी पार्क करणे टाळा.

CNG Car Tips
Amazon Premium Electronics Days : Amazon चा बंपर सेल, Apple स्मार्टवॉचवर मोठी सूट

लिकेजची वेळोवेळी तपासणी करा : सीएनजी टाकीमध्ये गळती होण्याचा धोका जास्त असतो. अशा स्थितीत कारला आग लागून धोकादायक अपघातही घडू शकतो. तुमच्याकडे सीएनजी कार असेल तर त्यासाठी गळतीची वेळोवेळी तपासणी करत रहा. अशा स्थितीत सीएनजी भरताना वेळीच टाकी भरू नये याची नोंद घ्यावी. कारला गळतीची समस्या येत आहे असे तुम्हाला वाटत असेल तर ताबडतोब मेकॅनिकला दाखवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.