CNG Kit For Old Cars :कारमध्ये CNG बसवल्यावर या दोन गोष्टी करा, नाहीतर...

CNG बसवला की झालं असं नाही, ही गोष्ट पण महत्त्वाची
CNG Kit For Old Cars
CNG Kit For Old Carsesakal
Updated on

CNG Kit For Old Cars : सीएनजी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती ११० रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. त्यामुळे लोक पर्यायी वाहनांचा स्वीकार करू लागले आहेत. पेट्रोल-डिझेलला पर्याय म्हणून सीएनजी वाहनं, इलेक्ट्रिक वाहनं आणि हायड्रोजन इंधनावर चालणारी वाहनं बाजारात विकली जात आहेत. मात्र यात सीएनजी हाच पर्याय उत्तम आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सीएनजी कारची मागणी झपाट्याने वाढत आहे. १० लाखरुपयांपेक्षा कमी किमतीच्या कार खरेदी करणाऱ्यांची सीएनजी कार ही पहिली पसंती ठरत आहे. मात्र, आता कंपन्या आपल्या प्रीमियम कारमध्येही सीएनजी व्हेरिएंट आणण्याच्या तयारीत आहेत. सीएनजीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कमी किंमतीत चांगले मायलेज मिळणे.(Science & Technology)

एकीकडे सीएनजी वाहनांची मागणी वाढत असताना दुसऱ्या बाजूला सीएनजी पंपांची संख्या देखील वाढू लागली आहे. पूर्वी सीएनजी स्टेशन केवंळ मोठ्या शहरांमध्येच असायचे. मात्र आता निमशहरी भागातही सीएनजी पंप उभे राहू लागले आहेत. त्यामुळे लोक आपल्या जुन्या कारमध्ये सीएनजी किट जोडून घेऊ लागले आहेत.(CNG)

CNG Kit For Old Cars
Car साठी नक्की काय योग्य? CNG की LPG

अनेकदा लोक सीएनजी किट लावतात पण ते आपल्या गाडीच्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटमध्ये म्हणजेच आरसीमध्ये लावत नाहीत. अशा वेळी तुमची पावती कापली जाऊ शकते, तुमची गाडीही जप्त केली जाऊ शकते. त्यामुळे प्रमाणित सीएनजी किट बसविणे तसेच आपल्या नोंदणीत त्याची नोंदणी करणे गरजेचे आहे.

जर तुम्ही कारमध्ये सीएनजी किट बसवले असेल तर त्याची आरसीमध्ये नोंदणी करा तसेच विमा कंपनीला कळवा आणि आपल्या कारच्या विम्यात बदल करा. तेथे सीएनजी कार म्हणून आपल्या कारची नोंदणी करा.

CNG Kit For Old Cars
CNG Rate : ‘एमएनजीएल’च्या घरगुती गॅस दरात ५.७० रुपयांची कपात; सीएनजी प्रतिकिलो ६ रुपयांनी स्वस्त

जर सीएनजीची माहिती आरसीवर असेल पण विमा पॉलिसीमध्ये त्याचा उल्लेख नसेल तर अपघात झाल्यास विमा कंपनी क्लेम देईल पण ती पूर्णपणे उपलब्ध होणार नाही. दावा निकाली निघेल आणि अप्रमाणित असेल. यासाठी कंपनी २५ टक्क्यांपर्यंत रक्कम कमी करू शकते.

जर आरसीमध्ये सीएनजीबद्दल कोणतीही माहिती नसेल पण तुम्ही ती इन्शुरन्समध्ये रजिस्टर केली असेल तर क्लेमच्या बाबतीत ते तुम्हाला क्लेमची रक्कम देतील की नाही हे कंपनीवर अवलंबून असते. काही कंपन्या असे दावे थेट फेटाळून लावतात.

CNG Kit For Old Cars
CNG Rate : ‘एमएनजीएल’च्या घरगुती गॅस दरात ५.७० रुपयांची कपात; सीएनजी प्रतिकिलो ६ रुपयांनी स्वस्त

आरसी आणि इन्शुरन्स या दोन्ही पॉलिसींमध्ये सीएनजीची माहिती उपलब्ध नसेल तर क्लेमचा प्रश्नच उद्भवत नाही. अशा वेळी कंपन्या कोणत्याही प्रकारचा दावा थेट फेटाळून लावतात.

आरटीओ ऑफीसमध्ये माहिती द्या

तुम्ही जर वाहनांमध्ये सीएनजी किंवा एलपीजी किट बसवण्यासारखे बदल केले आणि त्याची माहिती परिवहन प्राधिकरण आणि विमा कंपनीला दिली नाही तर तुमचा इन्श्योरन्स क्लेम नाकारला जाऊ शकतो. जेव्हा आपण आपल्या वाहनात स्वतंत्र सीएनजी किंवा एलपीजी किट बसवून घेतो, तेव्हा आपण आपल्या वाहनाचं इंधन तंत्रज्ञान बदलत असतो.

वाहनात सीएनजी किंवा एलपीजी किट बसवल्यानंतर राज्य परिवहन विभागाने जारी केलेल्या नोंदणी प्रमाणपत्रात डिझेल किंवा पेट्रोलऐवजी सीएनजी किंवा एलपीजी असं नमूद करावं लागतं. यासाठी तुम्हाला आरसी बुक, विमा पॉलिसीची प्रत, एलपीजी आणि सीएनजी किटचं इन्व्हॉईस आरटीओ कार्यालयात द्यावं लागेल.  

CNG Kit For Old Cars
CNG Kit Price: जुन्या गाडीत CNG किट बसवायचंय? इतका येईल खर्च

विमा कंपनीलाही कळवा

तुम्ही ज्या विमा कंपनीकडून वाहनाचा विमा उतरवला आहे त्या कंपनीशी संपर्क करावा लागेल. तिथे जाऊन तुम्ही तुमच्या वाहनाच्या इंधन तंत्रज्ञानामध्ये बदल केले आहेत, याची माहिती त्यांना द्यावी लागेल. यासाठी वाहन मालकाला काही सेल्फ अटेस्टेड डॉक्यूमेंट सादर करावे लागतील. या कागदपत्रांमध्ये आरटीओने जारी केलेलं आरसी बूक, एलपीजी किंवा सीएनजी किटचं इन्व्हॉईस आणि पूर्ण भरलेला अर्ज समाविष्ट आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()