कॉम्प्युटेशनल लिंग्विस्टिक्सचा (संगणकीय भाषाशास्त्र) वापर इन्स्टंट मशीन ट्रान्स्लेशन, डिजिटल लॅग्वेज लॅब, स्पीच रेकग्निशन सिस्टीम, टेक्स्ट-टू-स्पीच सिंथेसायझर, इंटरएक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टिम, नॅचरल लॅग्वेज प्रोसेसिंग, सर्च इंजिन, टेक्स्ट एडिटर आणि भाषा निर्देश सामग्री यांसारख्या अनेक ठिकाणी तसेच साधनांमध्ये केला जातो.
संगणकीय भाषाशास्त्र ही एक कला, वैज्ञानिक आणि अभियांत्रिकी शाखा आहे- जी संगणकीय दृष्टिकोनातून लिखित आणि बोलली जाणारी भाषा समजून घेण्याशी तसेच भाषांतर प्रक्रियेशी संबंधित आहे आणि ही मोठ्या प्रमाणात किंवा संवाद सेटिंगमध्ये उपयुक्तपणे प्रक्रिया आणि भाषेची निर्मिती करणारी संवादी कलाकृती तयार करते आहे.
संगणकीय उपयोजित भाषाशास्त्र (कॉम्प्युटेशनल अॅप्लाईड लिंग्विस्टिक्स) हे मानसशास्त्र, शैक्षणिक संशोधन, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, अध्यापनशास्त्र, राज्यशास्त्र, संवाद आणि माध्यमअभ्यास आणि अर्थशास्त्र यासारख्या विविध विषयांवर लक्ष केंद्रित करणारे बहुविद्याशाखीय (मल्टिडिसिप्लिनरी) क्षेत्र आहे.
संपूर्ण ऑनलाइन पुस्तकासाठी परिचयात्मक मार्गदर्शक असे मशीन भाषांतर, नैसर्गिक भाषा इंटरफेस, व्याकरण आणि शैली तपासणे, दस्तऐवज प्रक्रिया आणि माहिती पुनर्प्राप्ती, संगणक-सहाय्यित भाषा शिक्षण आदी प्रक्रियांसाठीची कौशल्ये यामध्ये समाविष्ट आहेत.
या शाखेत कॉम्प्युटेशनल मॉर्फोलॉजी या उपशाखेद्वारे शब्दांच्या निर्मितीचा अभ्यास; तसेच वाक्यांच्या रचना निर्मितीचा अभ्यास, शब्दांच्या अर्थाचा अभ्यास आदी वैशिष्ट्यपूर्ण कौशल्यांद्वारे अनेक रोजगार संधी उपलब्ध होत आहेत.
नॅचरल लॅग्वेज प्रोसेसिंगच्या (एनएलपी) पाच टप्प्यांमध्ये लेक्सिकल (स्ट्रक्चर) विश्लेषण, पार्सिंग, सिमेंटिक विश्लेषण, प्रवचन (डिसकोर्स)एकत्रीकरण आणि (प्रॅगमॅटिक) व्यावहारिक विश्लेषण या ज्ञान कौशल्यांचा समावेश होतो. एनएलपी हे प्रचंड फायदे असलेले एक शक्तिशाली साधन आहे, परंतु तरीही नैसर्गिक भाषा प्रक्रियेच्या अनेक मर्यादा आणि समस्या आहेत यामुळेच या क्षेत्रामध्ये सर्जनशील नवनिर्मितीसाठी अनेक संधी आहेत.
संदर्भित शब्द, वाक्ये आणि समानार्थी शब्द, समानार्थी शब्द- व्यंग आणि व्यंग, संदिग्धता, म्हणी, मजकूर किंवा भाषणातील त्रुटी, बोलीभाषा आणि डोमेन-विशिष्ट भाषा, अल्प संसाधनांती भाषा या क्षेत्रात अनेक आव्हाने नवनिर्माण कौशल्यांची आवश्यकता उपलब्ध करत आहेत.
आयबीएम वॉटसन, गुगल क्लाऊड एपीआय तंत्रज्ञान, पायथन लायब्ररी स्टॅनफोर्ड कोर, टेक्स्ट ब्लॉब, मंकी लर्न, अॅमेझॉन कॉम्प्रीहेंड आदी अनेक टूल्सही या क्षेत्रातील विविध प्रकारच्या कार्यांसाठी वापरात आहेत.
डिजिटल भाषा प्रयोगशाळा (लॅग्वेज लॅब) हा सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म आहे जो हे ऐकणे, बोलणे, वाचन आणि लेखन पद्धतींवर आधारित भाषा शिकण्याची कौशल्ये देतो. कोणतीही भाषा शिकण्यासाठी आणि अभ्यासण्याची ही एक महत्त्वाची पद्धत अलीकडील काळात नव्याने रूढ होत आहेत. कॉम्प्युटर असिस्टेड लँग्वेज लॅबोरेटरी (कॉल) आणि वेब असिस्टेड लँग्वेज लॅबोरेटरी (वॉल) हे डिजिटल भाषा प्रयोगशाळेचे दोन आधुनिक आणि महत्त्वाचे प्रकार प्रचलित आहेत. यामुळेच या क्षेत्रातील कौशल्याधारित तज्ञांची आवश्यकता दिवसेंदिवस भासत आहे.
तंत्रज्ञानयुक्त परस्पर संवादी भाषाशास्त्राच्या अभ्यासाची वाढती मागणी; तसेच व्यक्तिमत्त्व विकासासाठी त्याचा होणारा उपयोग यामुळे कॉम्पिटिशनल लँग्विस्टिक्समध्ये अनेक नवसंधी निर्माण झालेल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या ‘स्पीच टू टेक्स्ट’ व ‘टेक्स्ट टू स्पीच’ या सुविधेमुळे ‘भाषा लेखनशैली’ आणि ‘बोलीभाषा शैली’ यांच्यातील ‘फरक रेषा’ धूसर झाली आहे त्यामुळेच निर्माण झालेल्या अनेक आव्हानांसाठी नवनिर्मितीची कौशल्ये अत्यावश्यक बनली आहेत.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक ऑपरेटिंग सिस्टिम्स, अनेक प्रकारचे सॉफ्टवेअर्स आणि तत्सम प्लॅटफॉर्म हे प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होत असल्याने कॉम्प्युटेशनल लिंग्विस्टिक्स या क्षेत्राची व्याप्ती व महत्व प्रचंड विकसित होत आहे. त्यामुळेच या क्षेत्रातील कौशल्यधारकांची मागणी सातत्याने वाढते आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.