Car Gearbox Types: गियरबॉक्स ऑप्शन्स मध्ये कंफ्युजन होतंय? मॅन्युअल ऑटोमॅटिक ते CVT-DCT मधला फरक समजून घ्या

कारमध्ये गीअर सिस्टम कशी काम करते याचा तुम्ही कधी विचार केलाय का? तर या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
Car Gearbox Types
Car Gearbox TypesSakal
Updated on

Car Gearbox Types: कारमध्ये गीअर सिस्टम कशी काम करते याचा तुम्ही कधी विचार केलाय का? तर या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

गिअरबॉक्स इंजिनची शक्ती चाकांपर्यंत नेतो. यामुळे तुमच्या कारला वेग मिळतो. बाजारात दोन प्रकारचे गिअरबॉक्स सर्वात जास्त वापरले जातात.

पहिला मॅन्युअल आहे तर दुसऱ्याला ऑटोमॅटिक म्हणतात. नव्या कारमध्ये अनेक प्रकारचे गिअरबॉक्सेस उपलब्ध आहेत जेणेकरुन कार वेगवेगळ्या स्पीड लेव्हलवरही चालेल.

कार गिअरबॉक्सला ट्रान्समिशन देखील म्हणतात. हा पार्ट गीअरवर अवलंबून असतो जो इंजिनची शक्ती चाकांपर्यंत पोहोचवतो. हा पार्ट इंजिन आणि चाकांच्या दरम्यान स्थित असते. गीअरबॉक्समध्ये अनेक गिअर्स, शाफ्ट्स आणि बियरिंग्ज असतात. बाजारात किती प्रकारचे गिअरबॉक्स उपलब्ध आहेत ते पाहू या.

सामान्यतः कारमध्ये मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक गिअरबॉक्स दिलेला असतो. ऑटोमॅटिकमध्येही विविध प्रकारचे गिअरबॉक्सेस उपलब्ध आहेत.

मॅन्युअल गिअरबॉक्स :

मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये गीअर्स हाताने टाकले जातात. याशिवाय, गिअरस्टिक आणि क्लच मॅन्युअली कंट्रोल केले जातात. मॅन्युअल ट्रान्समिशन स्वस्त आहेत त्यामुळे या कार किफायतशीर आहेत.

ऑटोमॅटिक गिअरबॉक्सच्या तुलनेत त्यांची देखभाल देखील खूप सोपी आहे. कमी खर्च आणि देखभाल लक्षात घेता मॅन्युअल गिअरबॉक्स भारतात सर्वात जास्त वापरला जातो.

ऑटोमॅटिक गिअरबॉक्स :

ऑटोमॅटिक गीअरबॉक्समध्ये, गीअर्स बदलण्यासाठी इलेक्ट्रिक सेन्सर असतात. यानंतर, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट (ECU) द्वारे गीअर्स बदलले जातात. मॅन्युअल गिअरबॉक्सपेक्षा ऑटोमॅटिक ट्रांसमिशन वापरणे सोपे आहे. मात्र, त्यांची देखभाल खर्चिक होते. यात बरेच ऑप्शन आहेत.

ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन (AMT): हायड्रोलिक्सद्वारे मॅन्युअल गिअरबॉक्स ऑटोमॅटिक पद्धतीने वापरला जातो. यामध्ये क्लच किंवा गिअर बदलण्याचा कोणताही प्रयत्न केला जात नाही. AMT गिअरबॉक्स इलेक्ट्रॉनिक सेन्सर असतात.

Car Gearbox Types
Amul Milk: अमूल दुधाच्या दरात पुन्हा वाढ, आता लिटरमागे दोन रुपये महागणार, आजपासून लागू होणार नवे दर

टॉर्क कन्व्हर्टर: या गिअरबॉक्समध्ये, फ्लुइड कपलिंगचा वापर करून इंजिनपासून चाकांपर्यंत पॉवर नेली जाते. यामध्ये गीअर बदलण्यासाठी क्लच पॅडलचा वापर केला जात नाही. कंटिन्युअली व्हेरिएबल ट्रान्समिशन (CVT): CVT ट्रान्समिशनमध्ये पुली सिस्टीम वापरली जाते.

ड्युअल क्लच ट्रान्समिशन (डीसीटी): या सिस्टीममध्ये गिअर्स बदलण्यासाठी दोन क्लच वापरले जातात. याला ऑड आणि इवन गीअर्ससाठी वेगळे क्लच मिळतात.

Car Gearbox Types
महिलांनो तरुणपणी घेतलेली जमीन उतारवयात होईल आधार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.