Conversion Kit : आता स्प्लेंडर मध्ये बसवा ईव्ही कन्वर्जन किट

भारतात पेट्रोलच्या किंमतीमुळे इलेक्ट्रिक टू व्हीलर्सच्या विक्रीत वाढ
Conversion Kit
Conversion Kitesakal
Updated on

Conversion Kit : भारतात पेट्रोलच्या किंमतीमुळे इलेक्ट्रिक टू व्हीलर्सच्या विक्रीत वाढ झाली आहे. गेल्या २ वर्षापासून अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक बाइक लाँच केल्या आहेत. हिलो स्प्लेंडर प्लस देशात सर्वात जास्त विकणारी बाइक आहे. या बाइकला दर महिन्यात लाखो लोक खरेदी करतात.

Conversion Kit
Maruti Suzuki 7 Seater Car : जुलै मध्ये येईल मारुती सुझुकीची नवीन 7 सीटर कार

आता स्प्लेंडर मध्ये इलेक्ट्रिक किट लावून पूर्णपणे इलेक्ट्रिक बाइक बनवण्याची किट सुद्धा आली आहे. ज्या लोकांना हिरो स्प्लेंडर मध्ये पेट्रोलच्या खर्चापासून दूर राहायचे आहे. त्या लोकांसाठी हा चांगला ऑप्शन आहे. ते ही इलेक्ट्रिक किट लावून खर्च कमी करू शकतात. या इलेक्ट्रिक किटच्या वापरासाठी आरटीओकडून मंजुरी सुद्धा मिळाली आहे.

Conversion Kit
Maruti Suzuki 7 Seater Car : जुलै मध्ये येईल मारुती सुझुकीची नवीन 7 सीटर कार

Hero Splendor EV conversion kit महाराष्ट्रातील ठाणे येथील ईव्ही स्टार्टअप कंपनी GoGoA1 द्वारा लाँच करण्यात आली आहे. याच किंमत ३५ हजार रुपये आहे. यावर ६ हजार रुपयांहून जास्त सीएसटी सुद्धा लागू शकतो. यासोबत तुम्हाला बॅटरीचा खर्च जवळपास १ लाख रुपये होईल.

Conversion Kit
Health Tips : रात्रीचं जेवन टाळणं हानिकारक असते?

तसेच हिरो स्प्लेंडर प्लसचा खर्च सुद्धा वेगळा आहे. त्यामुळे हे तुम्हाला चांगलेच महागात पडू शकते. GoGoA1 या इलेक्ट्रिक किटवर ३ वर्षाची वॉरंटी देत आहे. कंपनीचा दावा आहे की, एकदा बॅटरीला फुल चार्ज केल्यानंतर १५१ किमीहून जास्त रेंज मिळू शकते.

Conversion Kit
Nashik Corona Update : शहरातून कोरोना हद्दपार झाल्याचा दावा! महापालिका हद्दीत केवळ 2 कोविड रुग्णांची नोंद

सध्या भारतात दोन वर्षात टॉप सेलिंग रिवॉल्ट आरव्ही ४०० सोबत टॉर्क क्रेटॉस, ओबेन रोर, होप ऑक्सो, मॅटर ऐरा, कोमाकी रेंजर सह अनेक जबरदस्त इलेक्ट्रिक बाइक लाँच करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लोकांसमोर स्टार्ट अप कंपनी GoGoA1 ने जी इलेक्ट्रिक किटचा ऑप्शन ठेवला आहे. ते खूप खर्चीक आहे. कंपनी १.४५ लाख रुपयात रिफर्बिश्ड स्प्लेंडर, सीडी डिलक्स आणि सीडी डॉलला इलेक्ट्रिक किट देवून त्याची विक्री करीत आहे. याला ऑनलाइन ऑर्डर करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()