Ruturaj Gaikwad New Bike: भारतीय क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड सध्या आपल्या कामगिरीमुळे विशेष चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत एका ओव्हरमध्ये ७ सिक्स मारत विक्रम केला होता. आता ऋतुराजने नवीन बाईक जावा ४२ बॉबर खरेदी केली आहे. जावा ४२ बॉबर ही भारतीय बाजारातील लोकप्रिय बाईक आहे.
ऋतुराजने मूनस्टोन व्हाइटमध्ये तयार करण्यात आलेली नवीन जावा ४२ बॉबर बाईक खरेदी केली आहे. जावाच्या या बाईकची एक्स-शोरुम किंमत २.०७ लाख रुपये आहे. कंपनीच्या पेराकला देखील ग्राहकांची जबरदस्त पसंती मिळाली होती. पेराकनंतर ४२ बॉबर ही कंपनीची देशात विक्री होणारी दुसरी सर्वात स्वस्त बाईक आहे.
हेही वाचा: काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये
४२ बॉबर ही मानक ४२ वर आधारित आहे. परंतु, रोडस्टरच्या तुलनेत बाईकच्या स्टाइलमध्ये काही बदल करण्यात आले आहे. Jawa 42 Bobber मध्ये अनेक नवीन बदल करण्यात आले आहेत. राइडिंग एर्गोनॉमिक्सला लोअर सेट फ्लोटिंग सिंगल सीट, मोठे टायर, फॉरवर्ड सेट फुट बेग आणि नवीन हँडलबार असे अनेक बदल पाहायला मिळतात. सस्पेंशन सेट-अपमध्ये देखील अनेक बदल पाहायला मिळतात.
पेराकच्या तुलनेत ४२ बॉबरमध्ये सर्वात मोठा बदल इंजिनचा आहे. बाईकमध्ये ३३४cc चे पॉवरफुल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ड्यूल चॅनेल एबीएससह ६ स्पीड गियरबॉक्ससोबत येते. इंजिन ३०.२ bhp आणि ३२.७४ Nm पीक टॉर्क जनरेट करते. मित्रांसोबत लांबच्या प्रवासाला जायचे असल्यास ही बाईक परफेक्ट आहे.
दरम्यान, ऋतुराजच्या क्रिकेटमधील कामगिरीबद्दल सांगायचे तर विजय हजारे ट्रॉफीच्या दुसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये त्याने उत्तर प्रदेशविरोधात एकाच ओव्हरमध्ये ७ सिक्सर ठोकत इतिहास रचला होता. त्याने गेल्यावर्षी श्रीलंका दौऱ्यात टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. ऋतुराजने आतापर्यंत भारताकडून ९टी-२० आणि एक वनडे सामने खेळले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.