Cyber Fraud Alert : ऑनलाइन फोटो पोस्ट करताय? सावध व्हा! तुमचे फिंगरप्रिंट्स चोरी होऊ शकतात; काय आहे नवा फ्रॉड? सुरक्षेचा उपाय पाहा

Social Media Photos Pose Fingerprint Theft Risk : नुकत्याच समोर आलेल्या प्रकरणांमध्ये गुन्हेगारांनी सोशल मीडियावरील फोटोंमधून व्यक्तींचे फिंगरप्रिंट्स क्लोन करून आधार सक्षम पेमेंट सिस्टम (AEPS) च्या माध्यमातून बँक खात्यांमधून पैसे काढले आहेत.
Social Media Photos Pose Fingerprint Theft Risk
Social Media Photos Pose Fingerprint Theft Riskesakal
Updated on

Fingerprint Identity Theft : आजच्या डिजिटल युगात, सोशल मीडियावर फोटो पोस्ट करणं सर्वसामान्य झालं आहे. पण यामध्ये एक गंभीर धोका आहे ज्याकडे आपण दुर्लक्ष करतोय. तुमचे फिंगरप्रिंट्स, जे तुमच्या हाताच्या बोटांवर असतात, हे फोटोद्वारे चोरले जाऊ शकतात आणि फसवणूक केली जाऊ शकते.

नोएडामध्ये नुकत्याच समोर आलेल्या प्रकरणांमध्ये गुन्हेगारांनी सोशल मीडियावरील फोटोंमधून व्यक्तींचे फिंगरप्रिंट्स क्लोन करून आधार सक्षम पेमेंट सिस्टम (AEPS) च्या माध्यमातून बँक खात्यांमधून पैसे काढले आहेत. सायबर क्राईम विभागाचे अधिकारी नागरिकांना, विशेषतः विद्यार्थ्यांना, अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचा सल्ला देत आहेत.

फिंगरप्रिंट्ससारखी संवेदनशील माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यापासून टाळा, तुमच्या सोशल मीडिया खात्यांची सुरक्षा सेटिंग्ज वाढवा आणि दोन-अंकी प्रमाणीकरण (2FA) वापरून खात्यांची सुरक्षा सुनिश्चित करा, असा सल्ला तज्ञ देत आहेत.

Social Media Photos Pose Fingerprint Theft Risk
PAN-Aadhaar Linking : घरबसल्या एक मेसेज करून पॅनकार्डला आधार लिंक करा,लगेच पाठवा हा SMS

फिंगरप्रिंट्सची सुरक्षितता कशी राखावी?

1.सोशल मीडियावर सावध रहा: फिंगरप्रिंट्स किंवा इतर बायोमेट्रिक डेटा उघड करणारे फोटो किंवा माहिती पोस्ट करण्यापासून टाळा.

2. खाते सुरक्षित करा: सोशल मीडिया आणि बँकिंग अ‍ॅप्सवरील खात्यांच्या सुरक्षितता सेटिंग्ज वाढवा, आणि टु स्टेप वेरीफीकेशनचा वापर करा.

3. विश्वासार्ह प्लॅटफॉर्मचा वापर करा: बायोमेट्रिक डेटा शेअर करण्यासाठी अधिकृत आणि विश्वसनीय प्लॅटफॉर्मचाच वापर करा.

4.सॉफ्टवेअर अपडेट्स करा: तुमच्या डिव्हाइसेसवर नवीनतम सुरक्षा अपडेट्स इन्स्टॉल करा.

Social Media Photos Pose Fingerprint Theft Risk
Smartphone Launch : यंदाचा सप्टेंबर मोबाईल प्रेमींसाठी खास! लाँच होणार या नामवंत कंपन्यांचे ब्रँड स्मार्टफोन,एकदा बघाच

5. बायोमेट्रिक लॉग्स तपासा: तुमच्या बायोमेट्रिक डेटाचा वापर बँकिंग किंवा इतर सेवांसाठी होतो का, हे नियमितपणे तपासा.

6.सावध रहा: जर तुम्हाला तुमची बायोमेट्रिक माहिती चुकीच्या पद्धतीने वापरली जात असल्याची शंका आली, तर त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना कळवा.

फोटो पोस्ट करण्याआधी सावधानता बाळगा आणि तुमच्या सुरक्षिततेची काळजी घ्या, अन्यथा तुमच्या निष्काळजीपणामुळे गंभीर आर्थिक नुकसान होऊ शकतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.