Online Gaming : भारतातील पैसा गुपचूप परदेशात पाठवतायत गेमिंग कंपन्या; टॅक्सचोरीसाठी होतोय क्रिप्टोकरन्सीचा वापर

Gaming Tax : DGGI अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच एका पेमेंट अ‍ॅग्रिगेटर कंपनीच्या संचालकाला अटक केली.
Online Gaming
Online GamingeSakal
Updated on

विदेशी गेमिंग कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी भारतातील पोलिसांची मोठ्या प्रमाणात दमछाक होताना दिसतेय. कारण या कंपन्या भारतात कमावलेले पैसे बाहेर नेण्यासाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर करत आहेत. यासाठी त्या शेल फर्म्स आणि इतर माध्यमांचा वापर करत असल्यामुळे भारत सरकारचं अब्जावधींचं नुकसान होत आहे.

सध्या अशाच एका मोठ्या नेटवर्कची चर्चा सगळीकडे सुरू आहे. पारिमॅच ही एक ऑनलाईन गॅम्बलिंग कंपनी आहे. सायप्रस देशात या कंपनीचं हेड ऑफिस आहे. पारिमॅच कंपनीसाठी भारतामध्ये कित्येक नेटवर्क्स काम करतात, अशी माहिती डीजीजीआय मुंबईने काही दिवसांपूर्वी दिली. या कंपनीचे कित्येक नेटवर्क उघड करण्यात DGGIला यश मिळालं आहे.

Online Gaming
Sony PlayStation 5 : सोनी PS5 गेमिंग कन्सोलच्या चार कोटींहून अधिक युनिट्सची विक्री! आता मिळतोय 7,500 रुपयांचा डिस्काउंट

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पारिमॅचसाठी काम करणाऱ्या या नेटवर्कने आतापर्यंत तब्बल 700 कोटी रुपये देशाबाहेर पाठवले आहेत. क्रिप्टोकरन्सीमध्ये कन्व्हर्ट करून हे पैसे देशाबाहेर पाठवण्यात आले. कित्येक महिने तपास केल्यानंतर, आणि गेमिंग कंपन्यांसंबंधी सुमारे 400 जणांची चौकशी केल्यानंतर हे रॅकेट पकडलं गेलं आहे.

पारिमॅच ही अशा प्रकारे काम करणारी एकमेव कंपनी नाही. अशा कित्येक कंपन्या विदेशातून भारतात आपलं नेटवर्क चालवत आहेत. आपण सापडू नये यासाठी या कंपन्या कित्येक स्तरांच्या माध्यमातून संवाद साधतात. अगदी खालच्या स्तरावर असणाऱ्या व्यक्तींना कदाचित माहिती देखील नसतं की आपण नेमकं कोणासाठी काम करतो आहे.

DGGI अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच एका पेमेंट अ‍ॅग्रिगेटर कंपनीच्या संचालकाला अटक केली. या कंपनीची नोंदणी देखील करण्यात आलेली नव्हती. पारिमॅच ज्या कंपन्यांना गेमिंग आणि बेटिंग सर्व्हिस पुरवते त्यांचा पैसा या कंपनीत गोळा केला जात होता. यानंतर तो पुढे क्रिप्टोमध्ये कन्व्हर्ट करून दुबई आणि इतर देशांमध्ये पाठवण्यात येत होता.

Online Gaming
Tax on X Earnings: तुम्ही Twitter वरून पैसे कमवत आहात? तर भरावा लागेल 18% GST, काय आहे नियम?

अधिकाऱ्यांनी या प्रक्रियेत 400 हून अधिक बँक खाती फ्रीज केली आहेत. मात्र, यापूर्वीच एक मोठी रक्कम देशाबाहेर पाठवण्यात आल्याचं चौकशीत समजलं. मुंबईतून अटक करण्यात आलेल्या एका क्रिप्टो ऑपरेटरने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 96 कोटी रुपये क्रिप्टोमध्ये रुपांतरित करण्यात आले होते. अर्थात, हे कुणाच्या वॉलेटमध्ये गेले किंवा कुणाचे होते याबाबत त्याच्याकडून माहिती मिळाली नाही. आपल्याला एका अनोळखी व्यक्तीने फोन आणि ईमेलच्या माध्यमातून याबाबत सूचना दिल्या, असं त्याने सांगितलं.

ईडीचाही तपास सुरू

याप्रकरणी अंमलबजावणी संचलनालय (ED) देखील देशात कित्येक ठिकाणी तपास करत आहे. कित्येक शेल कंपन्या देशात कार्यरत असल्या, तरी त्यांचे कार्यालय आणि नोंदणी ही विदेशातील आहे. विदेशातील कंपन्यांना भारतीय टॅक्स नियम लागू होत नाहीत, त्यामुळे ही सोय करण्यात आली आहे. भारतात नोंदणीच नसल्यामुळे टॅक्स चोरी करणं आरामात शक्य होतं.

Online Gaming
अर्थमंत्र्यांचा कंपन्यांवर सर्जिकल स्ट्राइक, सादर केले GST आणि IGST सुधारणा विधेयक, काय होणार बदल?

क्रिप्टो करन्सीवर नजर ठेवण्यासाठी इस्रायली कंपन्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान तयार केलं आहे. मात्र त्याचा वापर करणं या प्रकरणांमध्ये शक्य झालं नसल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. आणखी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यास आपण कदाचित हा पैसा ट्रेस करू शकू; असंही या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.