नेमके कोणते चलन असते 'प्रायव्हेट क्रिप्टोकरंसी'? जाणून घ्या

crypto currency
crypto currencyGoogle
Updated on

केंद्र सरकार या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात एक मोठे विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. सरकार, खाजगी क्रिप्टोकरन्सी आणि अधिकृत डिजिटल चलन नियमन विधेयक 2021 (The Cryptocurrency and Regulation of Official Digital Currency Bill, 2021) हे सभाग्रहात मांडणार आहे. मात्र या दरम्यान खाजगी क्रिप्टोकरन्सी (Private Cryptocurrency) ही टर्मकडे लक्षात घेण्याची गरज आहे. या निर्णयामुळे अनेक क्रिप्टो चलनांचा भाव मोठ्या प्रमाणामध्ये गडगडला आणि अनेक क्रिप्टो गुंतवणुकदारांची झोप उडाली आहे.

भारतात सध्या क्रिप्टोकरन्सीबाबत कोणतेही बंधने किंवा नियम नाहीयेत तसेच क्रिप्टोकरंसीमध्ये भारतीय गुंतवणूकदारांनी भरपूर पैसे देखील गुंतवले आहेत. लोकसभेच्या वेबसाइटनुसार, सरकार एक विधेयक आणून, रिझर्व्ह बँकेला स्वतःचे डिजिटल चलन आणण्याचे आणि त्याची रूपरेषा तयार करण्याचे अधिकार देईल. यासोबतच खासगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्यात येणार आहे. म्हणजेच बिटकॉइन, इथर, बिनन्स कॉईन, सोलाना आणि डोगेकॉइन, मोनेरो, डॅश या व्हर्चुअल चलनात व्यवहार करण्यावर देशात बंदी असेल.

खाजगी क्रिप्टोकरन्सी म्हणजे नेमके काय?

सरकार बंदी घालत असलेली क्रिप्टोकरंसीपैकी कोणत्या खाजगी क्रिप्टोकरन्सी आहेत हे सरकारकडून अद्याप स्पष्ट झालेले नाही. जरी बिटकॉइन, इथर किंवा इतर व्हर्चुअल करंसी देखील खाजगी क्रिप्टोकरन्सीचा एक प्रकार आहेत, ज्यामध्ये कोणत्याही केंद्रीय बँक किंवा सरकारचे नियंत्रण नसते. तसेच हे चलन वापरुन कोणतेही व्यवहार कुठल्याही नियम व अटीं शिवाय करता येतात, त्यावर कोणतेही बंधन असत नाही. हे तंत्रज्ञान वापरुन कोणीही नवीन करंसी सुरु करु शकतो. मोनेरो, डॅश आणि इतर क्रिप्टो टोकन देखील खाजगी क्रिप्टोकरन्सी मध्ये येतात. वापरकर्त्याची प्रायव्हसी या प्रायव्हेट क्रिप्टोकरन्सीमध्ये सुरक्षित ठेवली जाते. तसेच त्याचा डेटा देखील सुरक्षित राहतो. या क्रिप्टो करंसीला प्रायव्हेट टोकन देखील म्हणतात.

crypto currency
Cryptocurrency वर बंदी आणल्यास तुमच्या पैशांचं काय होणार?

हे कसं काम करतं?

क्रिप्टोकरन्सीबद्दल बोलायचे झाले तर हे एक प्रकारचे खाजगी व्हर्च्युअल चलन आहे. उदाहरणार्थ, बिटकॉइन किंवा इथर, ज्यांचे बाजार मूल्य खूप जास्त आहे. 1 बिटकॉइनची किंमत सुमारे 60 हजार डॉलर्स आहे. या चलनांमध्ये व्यवहार का पब्लिक लेजरद्वारे केला जातो. त्यात कोणीही सहभागी होऊ शकतो. तसेच क्रिप्टोकरन्सी ही ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर काम करते. ही एक डिजिटल फाइल आहे, ज्या कोणत्याही परिस्थितीत बदल केले जाऊ शकत नाहीत. हे डेटा ट्रांसफर साठी पीअर टू पीअर मेकॅनिझमवर काम करते. उदाहरणार्थ, जर एखाद्या वापरकर्त्याला 20 युनिट्स दुसर्‍या कुठेतरी ट्रांसफर करायचे असतील, तर सामान्यतः बँक किंवा केंद्रीय युनिट अशा व्यवहारावर नियंत्रण ठेवते. परंतु ब्लॉकचेनमध्ये कोणतेही असी सिस्टीम नसते. प्रत्येक वापरकर्ता यावर स्वतःचे नियंत्रण ठेऊ शकतो.

crypto currency
खासगी क्रिप्टोकरन्सीला चाप लावण्यासाठी केंद्र सरकार आणणार विधेयक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.