सायबर गुन्हेगार (Cyber crime) वापरकर्त्यांची माहिती चोरण्यासाठी नवीन धोरणांसह परत आले आहेत. त्यांनी व्हॉट्सॲप (WhatsApp), फेसबुक आणि इंस्टाग्रामला (Instagram) लक्ष्य केले आहे. मेटा-मालकीच्या कंपनीने नोंदवले आहे की, ३९ हजारांहून अधिक वेबसाइट्स अशा आढळल्या आहेत ज्या बनावट लॉगिनचा वापर करून वापरकर्त्यांचा डेटा चोरण्यासाठी तयार केल्या आहेत. या बनावट वेबसाइट्सच्या लॉगिन पेजवर पासवर्ड आणि ईमेल आयडी यासारखी संवेदनशील माहिती सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी वापरत आहे.
व्हॉट्सॲप (WhatsApp), फेसबुक (Facebook), इंस्टाग्राम आणि फेसबुक मेसेंजरच्या बनावट वेबसाइट्स तयार करण्यात आल्या आहेत. बनावट वेबसाइटवर क्लिक करून वापरकर्ता फसवणुकीचा बळी ठरतो. फेसबुकने एका ब्लॉग पोस्टमध्ये पुष्टी केली आहे की केवळ व्हॉट्सॲपच नाही तर इतर मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे सोशल मीडिया नेटवर्क इंस्टग्राम, फेसबुक आणि मेसेंजर फिशिंग हल्ल्यांसाठी (Cyber crime) वापरले जात आहेत. फेसबुकने फिशिंग हल्ल्यामागील सायबर दरोडेखोरांची ओळख उघड करण्यासाठी कॅलिफोर्निया न्यायालयात फेडरल खटला दाखल केला आहे.
अशी होते फसवणूक
सायबर गुन्हेगार (Cyber crime) सामान्यतः तुमच्या वास्तविक व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया खात्यांवर तसेच त्यामधील लिंक असलेल्या ईमेल मेल पाठवतात. या लिंक्सवर क्लिक करून वापरकर्त्यांना व्हॉट्सॲप, फेसबुक (Facebook) किंवा इंस्टाग्राम (Instagram) सारख्या दिसणाऱ्या बनावट वेबसाइटवर नेले जाते. ते बनावट असल्याचे वापरकर्त्यांनी ओळखले नाही तर ते लॉगइन करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याद्वारे अनवधानाने वापरकर्ता नाव आणि पासवर्ड सायबर गुन्हेगारांना देतात.
अशी घ्या खबरदारी
फिशिंग हल्ले करणाऱ्या लोकांना पकडण्यासाठी सोशल मीडिया काम करीत असले तरी, सावधगिरी बाळगून सोप्या युक्त्या वापरूनही त्यांना रोखू शकता. व्हॉट्सॲप (WhatsApp), इंस्टाग्राम, फेसबुक (Facebook) किंवा मेसेंजरवर तुम्हाला तुमचे फेसबुक युजरनेम आणि पासवर्ड वापरून लॉग इन करण्यास सांगणारे कोणतेही संशयास्पद ईमेल, मेसेज किंवा मजकूर आल्यास क्लिक करू नका. वैयक्तिक माहिती शेअर करू नका किंवा देऊ नका. कोणत्याही वेबसाइटवर काहीही करण्यापूर्वी शंभर टक्के खात्री करून घ्या. व्हॉट्सॲप किंवा फेसबुकच्या मालकीच्या सोशल मीडिया नेटवर्कवरून लिंक किंवा अटॅचमेंट असल्याचा दावा करणारा ईमेल मिळाला असला तरीही त्यावर क्लिक करू नका.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.