Cyber Fraud : 82 टक्के भारतीय करतात धोकादायक लिंकवर क्लिक, धक्कादायक रिपोर्ट समोर; 'या' मेसेजपासून रहा सावध!

भारतीयांना दिवसाला सुमारे 12 फसवणुकीचे मेसेज येतात.
Cyber Fraud Message
Cyber Fraud MessageeSakal
Updated on

सायबर सिक्युरिटी कंपनी मॅकअ‍ॅफीने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये असा दावा करण्यात आला आहे, की भारतीयांना दिवसाला सुमारे 12 फसवणुकीचे मेसेज येतात. यामध्ये टेक्स्ट, व्हॉट्सअ‍ॅप, इमेल आणि सोशल मीडियावर आलेल्या मेसेजेसचा समावेश आहे. सोबतच 82 टक्के भारतीय अशा लिंक्सवर क्लिक करतात असंही या अहवालात स्पष्ट झालं आहे.

सध्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सायबर गुन्हेगारीचं प्रमाणही वाढलं आहे. लोकांची फसवणूक करण्यासाठी कधी धमकी, कधी ऑफर्स तर कधी धोक्याचा इशारा अशा विविध प्रकारे लोकांना जाळ्यात अडकवलं जातं. अशाच प्रकारच्या धोकादायक मेसेजेसची यादी या संस्थेने प्रसिद्ध केली आहे.

Cyber Fraud Message
Cyber Fraud: ...अन्यथा दिवाळीत बसेल झटका, 'दिवाळी' अन् 'पूजा' नावानं डोमेन तयार करुन होतेय फसवणूक

गिफ्टचं आमिष

कित्येक वेळा आपल्याला असे मेसेज मिळत असतील, ज्यामध्ये आयफोन किंवा मोठी कार जिंकण्याची संधी मिळत असल्याचा उल्लेख असतो. यासोबत एक लिंकही देण्यात आलेली असते. अशा मेसेजमधील लिंकवर क्लिक करणं टाळावं.

नोकरीचं आमिष

कोणतीही कंपनी तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर नोकरीची जाहिरात पाठवत नाही. तशा प्रकारचं बोलणं आधी फोनवर झालं असल्यास गोष्ट वेगळी आहे, मात्र थेट जॉब ऑफर्स शक्यतो अशा प्रकारे येत नाहीत. त्यामुळे असे मेसेज इग्नोर करणे उत्तम.

याचाच दुसरा प्रकार म्हणजे यूट्यूब व्हिडिओ किंवा इन्स्टाग्राम पोस्ट लाईक्स करुन पैसे कमावण्याचं आमिष. अगदी महाराष्ट्रात देखील अशा प्रकारच्या स्कॅमला कित्येक लोक बळी पडले आहेत. तुम्हाला जर या कामासाठी चांगले पैसे मिळतील असा मेसेज आला, तर त्याकडे दुर्लक्ष करणंच उत्तम.

Cyber Fraud Message
Amazon Fraud : 'रेडो' कंपनीच्या घड्याळाचे फोटो दाखवून ग्राहकाची फसवणूक, ॲमेझॉनवर गुन्हा दाखल; नागपुरातील प्रकार

डिलिव्हरी अपडेट

एखाद्या सामानाची डिलिव्हरी फेल झाली आहे, तेव्हा लिंकवर क्लिक करुन पुन्हा पत्ता द्या, किंवा दिलेल्या नंबरवर कॉल करा - अशा प्रकारचे मेसेज करुन फसवणूक करण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. तुम्ही ऑनलाईन काही मागवलं असेल, तर त्याबाबत डिलिव्हरी अपडेट केवळ अधिकृत वेबसाईट किंवा अ‍ॅपमध्येच तपासणे उत्तम.

बँक अलर्ट

तुमचं बँक अकाउंट बंद होईल, मिनिमम बॅलन्स कमी आहे, तुम्हाला दंड बसेल, क्रेडिट कार्ड ब्लॉक झालं आहे अशा प्रकारचे इशारे देणारे मेसेज लोकांना पाठवले जातात. अशा मेसेजसोबत आलेल्या लिंकवर क्लिक करणं टाळावं. शक्यतो बँकेतील कामे अधिकृत अ‍ॅपवरुन किंवा थेट शाखेत जाऊन करावीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()