Deepfake : आता आयटी मंत्रालय ठेवणार सोशल मीडिया कंपन्यांवर नजर; डीपफेकबाबत सात दिवसात मागितला स्टेटस रिपोर्ट

गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारने 'डीपफेक' तंत्रज्ञानाविरोधात पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
Govt on Deepfake
Govt on DeepfakeeSakal
Updated on

Government on Deepfake : गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारने 'डीपफेक' तंत्रज्ञानाविरोधात पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. आता याबाबत सोशल मीडिया कंपन्यांना नव्याने इशारा देण्यात आला आहे. या कंपन्यांना आयटी मंत्रालयाचे नियम पाळण्यास सांगण्यात आलं आहे. सोबतच, डीपफेक संबंधी आक्षेपार्ह कंटेंटवर कंपन्यांनी स्वतःच कारवाई करावी असंही त्यांना सांगण्यात आलं आहे.

याबाबत मोदी सरकारने मंगळवारी नवीन अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. यामध्ये नियम 3(1)(b) नुसार जर सोशल मीडियावर (Social Media) एखादी व्यक्ती आक्षेपार्ह कंटेंट पोस्ट किंवा शेअर करत असेल, तर त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सोबतच, सोशल मीडिया कंपन्यांनी मिसइन्फॉर्मेशन (Fake News) आणि डीपफेक (Deep Fake) या गोष्टींवर करडी नजर ठेवावी असंही यात म्हटलं आहे.

माहिती व तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितलं, की सरकार पुढील काही दिवस सोशल मीडिया आणि इंटरनेट मीडिएटर्सच्या मदतीने या कंपन्यांवर नजर ठेवणार आहे. सोबतच, गरज पडल्यास आयटी नियमांमध्ये आणि कायद्यात देखील सुधारणा केली जाईल. एकूणच आयटी मंत्रालय आता सोशल मीडियावर लक्ष ठेऊन असणार आहे. (IT Ministry on Deepfake)

Govt on Deepfake
Deepfake: 'डीपफेक'वर कायदा होणार? देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली माहिती, केंद्रात तयारी सुरु

या कंपन्यांना बाल लैंगिक शोषणासंबंधी कंटेंट, अश्लील कंटेंट, बेकायदेशीर लोन अ‍ॅप्स अशा गोष्टींवर बंदी घालण्यास सांगण्यात आली आहे. सोबतच अशा गोष्टींची जाहिरात करणाऱ्या पोस्टही हटवण्यास सांगण्यात आल्या आहेत. सामान्य लोक लोन अ‍ॅप्स किंवा सट्टेबाजी संबंधित अ‍ॅप्सच्या जाळ्यात अडकू नयेत यासाठी देखील उपाययोजना करण्याची सूचना कंपन्यांना देण्यात आली आहे.

रिपोर्ट

आयटी मंत्रालयाने सर्व सोशल मीडिया कंपन्यांना सात दिवसांच्या आत 'अ‍ॅक्शन टेकन कम स्टेटस रिपोर्ट' मागितला आहे. मागील बैठकीनंतर याबाबतीत काय केलं हेदेखील या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यास सांगितलं आहे.

Govt on Deepfake
Deepfake Scam : मित्राचं रुप घेऊन केला व्हिडिओ कॉल, डीपफेकच्या मदतीने हजारोंचा गंडा! कशी झाली फसवणूक?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()