Swiggy Hacked : आधी स्विग्गी अकाउंट केलं हॅक, मग केली लाखोंची ऑर्डर! दोन हॅकर्स ताब्यात..

Swiggy Account hacked : 25 आणि 23 वर्षे वय असणाऱ्या या तरुणांनी हा प्रताप केला आहे. यातील एक तरुण आधी स्विग्गी आणि झोमॅटोमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता.
Swiggy Account Hacked
Swiggy Account HackedeSakal
Updated on

Delhi Woman Swiggy Account Hacked : सध्या सायबर गुन्हेगारीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. सायबर गुन्हेगार हे केवळ फोनमधील बँकिंग अ‍ॅप्सना टार्गेट करतात असं जर तुम्हाला वाटत असेल, तर थोडं थांबा! दिल्लीमध्ये एका महिलेचं फूड डिलिव्हरी अ‍ॅप हॅक करुन, त्यावरुन तब्बल एक लाख रुपयांची ऑर्डर केल्याची घटना समोर आली आहे.

याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. 25 आणि 23 वर्षे वय असणाऱ्या या तरुणांनी हा प्रताप केला आहे. यातील एक तरुण आधी स्विग्गी आणि झोमॅटोमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. इंडियन एक्स्प्रेसने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. (Swiggy Account hacked)

कसं केलं अकाउंट हॅक?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आरोपी 'इंटरॅक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्स सिस्टीम'चा वापर करुन लोकांचे स्विग्गी अकाउंट हॅक करत होते. यानंतर हॅक केलेल्या अकाउंटचा वापर करुन ते स्विग्गी इन्स्टामार्टवरुन किराणा सामान ऑर्डर करायचे. हे सामान ते पुढे कमी किंमतीला विकून टाकत होते.

Swiggy Account Hacked
Recover Hacked Insta ID : हॅक झालेलं इन्स्टा अकाउंट कसं मिळवायचा परत? कंपनीच्या मेलकडे करू नका दुर्लक्ष

महिलेच्या अकाउंटवरुन लाखांची ऑर्डर

सुल्तानपूरमधील एका महिलेचं अकाउंटही या दोघांनी हॅक केलं होतं. या महिलेने याबाबत पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. या महिलेला रात्री उशीरा एक 'ऑटोमेटेड टेलिफोनी इंटरॅक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्स सिस्टीम'वरुन (IVR) कॉल आला होता. त्या महिलेला रेकॉर्डेड आवाजात हे सांगण्यात आलं होतं, की तिचं अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

यानंतर या महिलेचं अकाउंट हॅक झालं, आणि त्यातून तब्बल 97,197 रुपयांची ऑर्डर करण्यात आली. यामध्ये देखील किराणा सामान मागवण्यात आलं होतं. डिलिव्हरीसाठी देण्यात आलेला नंबर खोटा होता. मात्र पत्ता गुडगावचा होता. पोलिसांनी या माहितीच्या आधारे तपास करून दोघा आरोपींना ताब्यात घेतलं.

Swiggy Account Hacked
Smart Toothbrush Hacked : 'स्मार्ट टूथब्रश'देखील होऊ शकतात हॅक? व्हायरल बातमीमधील दाव्यात किती आहे तथ्य?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.