Delhi acid attack: दिल्ली हादरवणाऱ्या अ‍ॅसिड हल्ल्याचं फ्लिपकार्ट कनेक्शन! पोलिसांनी पाठवली नोटीस

दिल्लीच्या द्वारका येथे १२वीच्या विद्यार्थीनीवर झालेल्या अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात आता ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टला नोटीस पाठवण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी ही नोटीस पाठवली आहे.
Flipkart
FlipkartSakal
Updated on

Delhi acid attack: दिल्लीच्या द्वारका येथे १२वीच्या विद्यार्थीनीवर झालेल्या अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात आता ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टला नोटीस पाठवण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी ही नोटीस पाठवली आहे. रिपोर्टनुसार, आरोपीने फ्लिपकार्टवरून अ‍ॅसिड खरेदी केले होते.

द्वारका येथील १७ वर्षीय विद्यार्थीनीवर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्यामुळे दिल्ली पुन्हा एकदा हादरली आहे. या घटनेतील मुख्य आरोपींसह ३ जणांनी पोलिसांनी अटक केले आहे. या घटनेत मुख्य आरोपी सचिन आरोरा असून, त्याच्यासोबत हर्षित अग्रवाल आणि वीरेंद्र सिंह हे दोघे देखील होते. आरोपींनी ऑनलाइन अ‍ॅसिड मागवले होते. या हल्ल्यात विद्यार्थीनी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हेही वाचा : प्राप्तिकर- कशाने मिळेल सूट, कशावर भरावा लागेल कर....

याबाबत माहिती देताना स्पेशल सीपी सागर प्रीत हुड्डा यांनी माहिती दिली की, सकाळ ८.४५ वाजता डीडीयू हॉस्पिटलमधून १७ वर्षीय तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला झाल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी त्वरित तक्रार दाखल करत आरोपींचा तपास सुरू केला होता. आरोपींना पकडण्यासाठी वेगवेगळ्या टीम स्थापन्यात आल्या होत्या. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केले. यातील मुख्य आरोपी सचिन आरोरा हा २० वर्षांचा आहे.

मुख्य आरोपीची चौकशी केली असता माहिती मिळाली, सचिनने पीडितेशी सप्टेंबर महिन्यात मैत्री केली होती. तसेच, या आरोपींनी ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून अ‍ॅसिड खरेदी केल्याचे चौकशीत समोर आले. आता या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी फ्लिपकार्टला नोटीस बजावली आहे. तसचे, दिल्ली महिला आयोगाने देखील बेकायदेशीररित्या अ‍ॅसिड विक्री केल्याने फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनला नोटीस बजावली आहे.

हेही वाचा: McLaren 765LT: देशातील सर्वात महागडी कार खरेदी करणारा नसीर खान नक्की करतो काय? जाणून घ्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.