Devendra Fadanvis on Cyber Crime : आज विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एनसीआरबी डेटा आणि राज्यातील गुन्ह्यांची परिस्थिती याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी सायबर गुन्हेगारीबाबत देखील माहिती दिली.
गेल्या काही वर्षांपासून सेक्स्टॉर्शन सारखे गुन्हे समोर येत आहेत. सायबर क्राईममध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मोबाईल-कम्प्युटरचा वापर करुन जे गुन्हे होत आहेत, अशा गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सायबर प्रोजेक्ट हाती घेण्यात आला आहे, असं फडणवीस म्हणाले.
यासाठी 837 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आहे. यामध्ये अतिशय डायनॅमिक प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत आहे. यामध्ये राज्यातील बँका, एनबीएफसी, फायनॅन्शिअल इन्स्टिट्यूशन्स, सोशल मीडिया साईट्स अशा सर्व गोष्टी या प्लॅटफॉर्मवर एकत्र आणण्यात येणार आहेत. कोणताही सायबर गुन्हा घडला, की त्याला क्विक रिस्पॉन्स देता यावा यासाठी एक एलिट फोर्स या माध्यमातून तयार करतो आहोत.
पुढच्या तीन ते चार महिन्यांमध्ये याबाबतची कार्यवाही पूर्ण होईल. सध्या राज्यात 48 सायबर पोलीस ठाणे आहेत, तसेच 44 सायबर लॅब सुरू करण्यात आलेल्या आहेत. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हे डिटेक्ट करता येत आहेत.
ऑनलाईन लॉटरी आणि ऑनलाईन गेमिंग यात दोन प्रकार आहेत. काही लोक कायदेशीररित्या करत आहेत, तर काही लोक चुकीच्या पद्धतीने करत आहेत. टीव्हीवर अनेक वेळा याबाबत जाहिराती पहायला मिळतात. क्रिकेट प्रीमियर लीगच्या काळात भरपूर जाहिराती असतात, ज्यामुळे लोकांमध्ये याबाबत व्यसन तयार होत आहे.
एका अकाउंटवरुन मर्यादित पैसे लावता येत असल्यामुळे लोक विविध नावांनी अकाउंट तयार करत आहेत. त्यामुळे यासंदर्भात नागरिकांनी स्वतः देखील काळजी घेणं गरजेचं आहे. हे सगळं डिजिटल आहे. डार्क नेटच्या माध्यमातून यातील बरेच व्यवहार पार पडतात. मात्र एकदा आपला सायबर प्लॅटफॉर्म तयार झाला, तर यावर मोठ्या प्रमाणात आळा घालता येईल; असं ते म्हणाले.
याचं विनियमन करण्यासाठी कायद्याची गरज आहे. मात्र, राज्य सरकारने कायदा करुन त्याचा कितपत फायदा होईल याबाबत मला संशय आहे. त्यामुळे आम्ही केंद्राकडे याबाबत मागणी करणार आहोत, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.