Oil Refinery : देशातील पहिली ऑईल रिफायनरी समुद्र किनाऱ्यावर नाही ! हत्तीमुळे सापडलं होतं तेल

आसाम रेल्वे आणि ट्रेडिंग कंपनीत काम करणाऱ्या लोकांना या ठिकाणी तेल असल्याची शंका आली आणि त्यांनी ती इंग्रज अधिकाऱ्याला बोलून दाखवली.
Oil Refinery
Oil Refinerygoogle
Updated on

मुंबई : तेलाचा विषय निघाला की आखाती देशच आठवतात. पण तुम्हाला माहितीये का भारतातही तेलाचे साठे सापडले होते आणि तेही फक्त एका हत्तीमुळे.

आसाममधील दिग्बोई येथे कच्च्या तेलाचे साठे सापडले होते. याबाबत भारतीयांना फारशी माहिती नाही. (digboie oil refinery in india first oil refinery in asia )

Oil Refinery
Viral Tweet : जॉब ऑफर करणाऱ्या सीईओला महिलेने दिलं असं उत्तर की दोन वर्षांनंतरही तो विसरला नाही

दिग्बोई हे आसाममधील सर्वात श्रीमंत शहर. इथे प्रशस्त रस्ते, बंगले आणि गोल्फ क्लब असत. या ठिकाणी तेलाचे साठे सापडतील असं कोणालाही वाटलं नव्हतं. पण तसं झालं आणि तेही एका हत्तीमुळे.

हत्तीमुळे तेलाचे साठे कसे मिळाले हे आपण जाणून घेणारच आहोत पण या ठिकाणाला दिग्बोई हे नाव कसं पडलं हेही जाणून घेऊ.

तेलासाठी उत्खनन सुरू असताना इंग्रज अधिकारी डिग बॉय डिग अशा सूचना कामगारांना देत. आणखी खोद असा त्याचा अर्थ होता. याचा अपभ्रंश होऊन दिग्बोई असं नाव या ठिकाणाला पडलं.

Oil Refinery
Maharashtra Din : जयंत नाडकर्णी : मालदीवचं बंड भारतीय सैन्याने कसं मोडून काढलं ?

आसाम रेल्वे आणि ट्रेडिंग कंपनीत काम करणाऱ्या लोकांना या ठिकाणी तेल असल्याची शंका आली आणि त्यांनी ती इंग्रज अधिकाऱ्याला बोलून दाखवली.

झालं असं की एका हत्तीचा पाय एकदा चिखलात अडकला होता. खूप मेहनतीने हा पाय बाहेर काढण्यात आला. यावेळी हत्तीच्या पायाला तेलाचा वास आल्यामुळे इथे तेल असल्याची शंका आली. ही घटना १८६७ सालची.

त्यानंतर १८८९ साली खोदकामाला सुरुवात झाली व आशियातील पहिल्या तेलसाठ्याचा शोध लागला. १८९९ साली आसाम ऑईल कंपनीची स्थापना करण्यात आली.

७ हजार बॅरल्स प्रति दिवस इतकं तेल इथे मिळत होतं. पण दुसऱ्या महायुद्धात तेलाची गरज वाढल्याने इंग्रज अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त तेल मिळावं यासाठी दबाव टाकला.

नवीन तेल तयार होण्यासाठी थोडा साठा जमिनीत जपून ठेवणं गरजेचं होतं. वाढत्या दबावामुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष झालं आणि महायुद्धानंतर तेल उत्पादन प्रचंड घटलं.

हाताने खोदकाम करण्यात आलेली ही पहिली आणि एकमेव तेल विहीर आहे. दिग्बोई रिफायनरी आता इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचा भाग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.