Digital Skills - कौशल्यवर्धिष्णू गुगल स्किलशॉप

गुगल स्किलशॉप हा कौशल्यवर्धन प्लॅटफॉर्म आहे.
Skills
Skills sakal
Updated on

गुगल स्किलशॉप हा कौशल्यवर्धन प्लॅटफॉर्म आहे. त्याचा वापर तुम्ही गुगलच्या टूल्स आणि सोल्यूशन्सवर तुमची रोजगार क्षमता वाढवण्यासाठी तुमच्या स्वत:च्या गतीने पूर्ण करू शकता. दैनंदिन जीवनात गुगलची टूल्स प्रभावीपणे अन्य अनेक कारणांसाठीची उपयोगिता सिद्ध करणारी अनेक कौशल्ये यामध्ये समाविष्ट असून त्यात सातत्याने वाढत होत आहे. गुगल वर्कस्पेस प्लॅन तुमच्या व्यवसायासाठी कस्टम ईमेल देतात आणि जीमेल, गुगल कॅलेंडर, गुगल मॅप, गुगल चॅट, गुगल ड्राईव्ह, गुगल शीट, गुगल फॉर्म्स, गुगल साईटस, गुगल स्लाइडस, गुगल टास्क्स आणि बरेच काही यासारखी सहयोग साधने समाविष्ट करतात जी तुम्हाला अनेक कार्यांसाठी उपयोगी आहेत.

तुम्ही स्किलशॉप खाते सेट केल्यावर, तुम्हाला विनामूल्य गूगल ॲड्स हा प्रमाणपत्र मूल्यांकन आणि संबंधित शिक्षण व कौशल्य विकासासाठी टूल्स वापराचा अ‍ॅक्सेस मिळेल. त्याचा तुम्ही मुल्यांकनासाठी तसेच गुगल ॲड्स उत्पादन व अन्य कार्यक्षेत्रात प्रमाणित होण्यासाठी उपयोग करून घेऊ शकता.

गुगल मार्केटप्लेस मध्ये ५०००पेक्षा जास्त थर्ड पार्टी ॲप्स ही विविध श्रेणींमध्ये उपलब्ध आहेत. व्यवसाय साधने, दस्तऐवज व्यवस्थापन, कार्यप्रवाह, शिक्षण, विक्री आणि ग्राहक संबंध व्यवस्थापन तसेच आयटी सपोर्ट, वापरकर्ता अनुभव डिझाइन, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, डेटा अॅनालिटिक्स, डिजिटल मार्केटिंग आणि ई-कॉमर्स आदी अनेक डिजिटल संबंधित क्षेत्रांचा समावेश होतो

गुगल स्किल शॉपमध्ये माय बिझनेस, अॅड मॅनेजर, अॅड मॉब, अॅथॉराईज्ड बायर्स, वाजे, अॅनालायटिक्स अॅकॅडमी आदी अनेक कौशल्यवर्धन सुविधा उपलब्ध आहेत.

ऑनलाइन जगतामध्ये जाहिरात मोहीम राबवण्यासाठी गुगलने अनेक वैशिष्ट्यपूर्ण टूल्स आणि त्यांची कौशल्य विकसित करण्याचे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले आहेत. सर्च अॅडस, क्रिएटिव्हज, मोबाईल एक्सपिरीयन्स, डिस्प्ले अॅन्ड व्हिडिओ ३६०, प्रोग्रॅमॅटिक कन्सेप्ट्स, गुगल अॅडवर्ड, गुगल अॅड एक्स्प्रेस आदी अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. जाहिरात मोहिमेतील पारंपारिक कौशल्ये आणि ऑनलाइन जगताची जाहिरात कौशल्ये यामधील कौशल्य विकासाचा टप्पा मोठा असल्याने अनेक नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत.

अॅड मॉबच्या आवश्यक गोष्टींमध्ये प्रभुत्व मिळवून कमाईसाठी तुमचे अॅप कसे सेट करायचे, तुमच्या अॅपसाठी योग्य जाहिरात फॉरमॅट्स कसे निवडायचे, मध्यस्थ प्लॅटफॉर्मसह कमाई कशी वाढवायची, तुमच्या या प्रगतीचा अहवाल आणि तुमच्या अॅपवर दिसणाऱ्या जाहिरातींचे प्रकार कसे नियंत्रित करावयाचे आदी अनेक तांत्रिक कौशल्ये यामध्ये विविध सहयोगी टुल्सद्वारे आत्मसात करता येतात. तुमच्या व्यावसायिक साईटसाठी एकापेक्षा अधिक विश्लेषणे आणि मार्केटिंग टॅग व्यवस्थापित करणे हे एक आव्हान असू शकते. यासाठी गुगल टॅग व्यवस्थापन तुम्हाला उपयोगी पडते. या कौशल्यामध्ये विश्लेषण आणि विकासकांसाठी टॅग अंमलबजावणी आणि व्यवस्थापन प्रक्रिया सुलभ करू शकता.

गुगल ऑप्टिमाइझ सारखे टुल हे लहान व्यवसायांसाठी एबी चाचणी, वेबसाइट चाचणी आणि वैयक्तिकरण साधने ऑफर करते. जेणेकरून ऑनलाइन ग्राहकांना आकर्षक अनुभव देण्यात मदत होते. वेबसाइटच्या सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन प्रक्रियेत याचा उपयोग महत्त्वाचा आहे. वेबसाइटचे ट्रॅफिकचे विश्लेषण तसेच ट्रॅकिंग करण्यासाठी गुगल अॅनालायटिक्स प्लॅटफॉर्मही उपयोगी पडतो. गुगल स्किलशॉप मधील अशी अनेक कौशल्ये सातत्याने विकसित होत आहेत तसेच नवनवीन कौशल्यांची भर पडते आहे त्यामुळेच त्या क्षेत्रात अनेक नवीन रोजगारांच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.