National Science Day : किरणोत्सारी पाण्याच्या शुद्धीकरणासाठी नवा पदार्थ

आण्विक कचऱ्यामुळे होणारे जलप्रदूषण मानवासाठी जीवघेणे ठरते. तसेच औद्योगिक वसाहतींतून येणाऱ्या मैलापाण्यामुळेही पिण्याचे साठे दिवसेंदिवस प्रदूषित होत असून, शास्त्रज्ञ किफायतशीर आणि विश्वासार्ह जलशुद्धीकरणाचा पर्याय शोधत आहेत.
National Science Day
National Science Daysakal
Updated on

पुणे : आण्विक कचऱ्यामुळे होणारे जलप्रदूषण मानवासाठी जीवघेणे ठरते. तसेच औद्योगिक वसाहतींतून येणाऱ्या मैलापाण्यामुळेही पिण्याचे साठे दिवसेंदिवस प्रदूषित होत असून, शास्त्रज्ञ किफायतशीर आणि विश्वासार्ह जलशुद्धीकरणाचा पर्याय शोधत आहेत. पुण्यातील शास्त्रज्ञांनी केवळ रासायनिक नाही तर किरणोत्सारी पाण्याचे शुद्धीकरण करणाऱ्या पदार्थांचा शोध घेतला आहे.

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन परिषदेने (आयसर पुणे) एक हायब्रीड कंपोझिट (फोम) विकसित केले असून, ज्यामुळे अर्सेनिक, क्रोमियमसारख्या विषारी घटकांबरोबरच किरणोत्सारी आयोडीनही विलग करता येते. आयसरच्या रसायनशास्त्र विभागाचे डॉ. सुजित घोष यांच्या नेतृत्वात साहिल फैजल, व्रिताक्षी मंडल यांनी यासंबंधीचे संशोधन केले असून, नुकतेच नेचर या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्धही झाले आहे. झिर्कोनियम बेस्ड मेटल ऑर्गेनिक पॉलीहायड्रा नावाच्या पदार्थाची रचना द्विस्तरीय सूक्ष्म सच्छिद्र स्वरूपाची असून, जैविक रेणूंबरोबरच किरणोत्सारी पदार्थांना अटकाव करते. आजवर फार कमी पदार्थ शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. ‘आयसर’ पुण्याच्या शास्त्रज्ञांनी शोधलेला या पदार्थाची क्षमताही जास्त आहे.

National Science Day
National Science Day : सी.व्ही. रामन यांना पडलेला 'तो' प्रश्न त्यांना नोबेलपर्यंत घेऊन गेला

पदार्थाचे नाव : आयसर पुणे कॉम्प ७

अर्थात आयपीकॉम्प- ७

रचना : द्विस्तरीय सच्छिद्र कोव्हॅलंट

ऑर्गेनिक फ्रेमवर्क

स्वरूप : एरोजेल स्वरूपात विकसित

कार्य : हवा आणि पाण्यातून किरणोत्सारी आयोडिन विलग करतो

आम्ही विकसित केलेला आयपी कॉम्प-७ हा जलशुद्धीकरणासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. एक प्रकारे रेण्वीय अभियांत्रिकीचा हा उत्तम नमुना आहे. ज्यामुळे किरणोत्सारी पदार्थ नॅनो ट्रॅपद्वारे विलग करता येतात. अर्सेनिक, क्रोमियमसारख्या विषारी घटकांच्या शुद्धीकरणाची क्षमताही या पदार्थात असण्याची दाट शक्यता आहे.

- साहिल फैजल, संशोधक विद्यार्थी

लोकोपयोगी संशोधनावर आयसर म्हणून आमचे नेहमीच प्राधान्य असते. किरणोत्सारी पदार्थांच्या शुद्धीकरणासाठी आयपीकॉम्प एक मोठी उपलब्धी आहे. भविष्यात उद्योगांच्या किंवा स्टार्टअप्सच्या साहाय्याने प्रत्यक्षात याचा वापर व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे.

- डॉ. सुजित घोष, शास्त्रज्ञ, आयसर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()