Affordable Smartwatch: दोन हजारात मिळणारं स्मार्टवॉच शोधाताय? भारतात लॉंच झाली 'ही' परवडणारी वॉच


 Noise ColorFit Pulse Smartwatch
Noise ColorFit Pulse Smartwatch
Updated on

Dizo ने भारतीय बाजारात डिझो वॉच डी प्लस (DIZO Watch D Plus) हे नवीन स्मार्टवॉच लॉन्च केली आहे. स्मार्टवॉचच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये मोठी स्क्रीन, अॅल्युमिनियम फ्रेम, 110+ स्पोर्ट्स मोड यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

डिझो वॉच डीची भारतात किंमत रु. 2,000 च्या आत आहे. या घड्याळाच्या लॉन्चसह, कंपनीने वॉच डी लाइनअपचा विस्तार केला आहे .कंपनीने आतापर्यंत डी सीरीज अंतर्गत तीन स्मार्टवॉच लॉन्च केले आहेत, ज्यात डिझो वॉच डी, वॉच डी प्लस आणि वॉच डी शार्प यांचा समावेश आहे. यापैकी नुकतेच लाँच झालेले डी प्लस मॉडेल सर्वात परवडणारे आहे. चला भारतातील डिझो वॉच डी प्लसची किंमत, फीचर्स आणि इतर तपशील पाहू या.

स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Dizo Watch D Plus ही मोठ्या 1.85-इंचाच्या डिस्प्लेसह येते, जी डिझो वॉच डी वॉच प्रमाणेच आहे. याची पीक ब्राइटनेस 550 nits आहे आणि स्क्रीन वक्र टेम्पर्ड ग्लासने संरक्षित आहे. फ्रेम अॅल्युमिनियमच्या बनलेल्या आहेत आणि सिलिकॉन स्ट्रॅप (22 मिमी) मटेरियलसह येतो. वापरकर्ते Google Play Store आणि Apple App Store वर उपलब्ध असलेल्या डिझो अॅपसह 150 पेक्षा जास्त वॉच फेस ऍक्सेस करू शकतात. तुम्ही वॉचवरील डॅशबोर्ड विजेट्स आणि वॉच फेससोबत कस्टमाइज करू शकता .हे 3ATM वॉटर रेझिस्टंट आहे, याचा अर्थ पाण्याच्या स्प्लॅशने त्यावर परिणाम होत नाही, परंतु पोहताना त्याचा वापर करता येत नाही.


 Noise ColorFit Pulse Smartwatch
Honda EM1 e: शाळा-कॉलेजात जाण्यासाठी होंडाची परफेक्ट इलेक्ट्रिक स्कूटर, काय आहे खास वाचा

डिझो वॉच डी प्लसमध्ये 300mAh बॅटरी युनिट आहे जी एका चार्जवर 14 दिवसांपर्यंत चालते. कंपनीचा दावा आहे की पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे दोन तास लागतील आणि घड्याळ 60 दिवसांपर्यंत स्टँडबाय टाइम मिळेल.

स्मार्टवॉचमध्ये जिम्नॅस्टिक, योग, हायकिंग, क्रॉस फिट, डान्सिंग, कराटे, तायक्वांदो, हॉर्स रायडिंग, डिस्क स्पोर्ट्स आणि असे इतर बरेच काही असलेले 110 स्पोर्ट्स मोड आहेत. वापरकर्ते थेट अॅपवरून स्मार्टवॉचमधील स्पोर्ट्स मोड लिस्ट बदलू शकतात. यात रिअल-टाइम हार्ट रेट सेन्सर, SpO2 मॉनिटर, स्लीप ट्रॅकर, मासिक पाळी ट्रॅकर, स्टेप काउंटर, कॅलरी ट्रॅकर, वॉटर ड्रिंक रिमाइंडर आणि सेडेंटरी रिमाइंडर देखील येतो. हे वॉच इनबिल्ट GPS सह येत नाही, त्यामुळे तुमच्या वर्कआउट मॅप तपासण्यासाठी तुम्हाला हे तुमच्या स्मार्टफोनशी कनेक्ट करावे लागेल.


 Noise ColorFit Pulse Smartwatch
Vi चा 50GB फ्री डेटा अन् Sony Liv सबस्क्रिप्शनसह येणारा बेस्ट प्लॅन; जाणून घ्या किंमत

वॉच डी प्लसच्या इतर वैशिष्ट्यांमध्ये फोन कॅमेरा कंट्रोल, म्युझीक कंट्रोल, अलार्म, फोन सर्च, कॉल आणि मेसेज नोटीफिकेशन, रिजेक्ट अॅन्ड सायलंट कॉल, हवामान अंदाज आणि बरेच काही मिळते.

किंमत आणि उपलब्धता

डिझो वॉच डी प्लसची किंमत 1,999 रुपये आहे आणि 15 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर विक्री सुरू होईल. हे घड्याळ तीन रंगांमध्ये उपलब्ध असेल: क्लासिक ब्लॅक, सिल्व्हर ग्रे आणि डीप ब्लू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.